वॉशिंग्टन: अमेरिकेने पाकिस्तानच्या TRFला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. TRF पाकिस्तान स्थित लष्कर ए तोयबाची संघटना आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी याबाबतची माहिती दिली. विशेष म्हणजे अमेरिकेने TRFला पहलगाम हल्ल्यासाठीही जबाबदार ठरवले आहे. या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो यांनी TRFला लष्कराचा मुखवटा असे म्हटले आहे. याचे मुख्यालय पाकिस्तानाच आहे आणि तेथूनच ऑपरेट केले जाते. अमेरिकेने पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच म्हटले होते की दहशतवादाविरूद्धच्या लढाईत ते भारतासोबत उभे आहेत.
TRFने घेतली होती पहलगाम हल्ल्याची जबाबदारी
रुबियो यांनी म्हटले की TRFला दहशतवादी संघटना घोषित करणे हे आमची राष्ट्रीय सुरक्षा हितांची रक्षा करण्याचे विचार दर्शवते. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आणि पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय देण्यासाठी आम्ही किती प्रतिबद्ध आहोत हे ही दर्शवते. TRFने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. याला अमेरिकेने २००८मध्ये मुंबई हल्ल्यानंर भारतातील नागरिकांसाठी सर्वात घातक दहशतवादी संघटना असल्याचे म्हटले होते.
पाकिस्तानला मोठा झटका
TRFला दहशतवादी संघटना घोषित केल्यानंतर पाकिस्तानला चांगलाच झटका बसला आहे. पाकिस्तानात दहशतवाद्यांना पोसले जाते आणि त्यांचा वापर भारताविरुद्ध केला जातो. आता TRFवर कडक प्रतिबंध लादले जाऊ शकतात.