Thursday, September 18, 2025

वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

जमैका: वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर क्रिकेटर आंद्रे रसेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात घरच्या मैदानावर टी-२० मालिकेतील सुरूवातीचे दोन सामने हे त्याचे शेवटचे सामने असतील. ३७ वर्षीय रसेला पाच सामन्यांच्या मालिकेसाठी विंडीज संघात सामील करण्यात आले आहे. या मालिकेचे सुरूवातीचे दोन सामने जमैकाच्या सबीना पार्क मैदानात खेळवण्यात येतील. या ऑलराऊंडर क्रिकेटरचे हे घरचे मैदान आहे. आपल्या होम ग्राऊंडवरून तो क्रिकेटला अलविदा म्हणणार आहे. विंडीज क्रिकेटने सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून त्याच्या निवृत्तीची बातमी दिली आहे.

आंद्रे रसेलने एका विधानात म्हटले, शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही याचा अर्थ काय होता. वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करणे माझ्या आयुष्यातील सर्वात गौरवाचा क्षण आहे. जेव्हा मी मुलगा होतो तेव्हा इथपर्यंत पोहोचेन याची आशा नव्हती. मात्र जसे जसे तुम्ही खेळणे सुरू करता आणि या खेळावर प्रेम करू लागता तेव्हा आपल्याला समजते की तुम्ही काय मिळवू शकता. यामुळे मला चांगले बनण्याची प्रेरणा मिळाली.

 

तो पुढे म्हणाला, मला वेस्ट इंडिजसाठी खेळायला आवडते. तसेच माझ्या कुटुंबियांसमोर आणि मित्रांसमोर खेळणेही मला आवडते. येथे मला माझी प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते. मला माझ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या प्रवासाचा शेवट अतिशय शानदार पद्धतीने करायचा आहे. सोबतच कॅरेबियन क्रिकेटर्सच्या पुढील पिढीसाठी आदर्श बनायचे आहे.

रसेल २०१९ पासून वेस्ट इंडिजसाठी टी-२० क्रिकेट खेळत आहे. त्याने वेस्ट इंडिजसाठी ८४ टी-२० सामने खेळलेत. त्यात त्याने २२.००च्या सरासरीने आणि १६३.०८च्या स्ट्राईक रेटने १०७८ धावा केल्यात. त्याने या दरम्यान तीन अर्धशतकी खेळी केल्या आहेत. त्याने आपल्या करिअरमध्ये केवळ एक कसोटी सामना खेळला. तर ५६ वनडे सामने खेळलेत. यात त्याने १०३४ धावा केल्या.

Comments
Add Comment