
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळची गाडी अखेरीस रूळावरून घसरली आहे. बाजाराअंती शेअर बाजार कोसळला असून सेन्सेक्स ३७५.२४ अंकाने घसरत ८२२५९.२४ व निफ्टी १००.६० अंकाने घसरत २५१११.४५ पातळीवर स्थिरावले आहेत. दोन्ही निर्देशांकात अनुक्रमे ०.५१%,०.४०% घसरण झाल्याने बाजार सकाळच्या तुलनेत अनपेक्षितपणे कोसळला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक ३२६.६७ अंकाने व बँक निफ्टी ३४०.१५ अंकाने कोसळल्याने बाजारात 'कंप' जाणवला आहे.सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.०७%,०.३०% वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.१७%,०.१२% घसरण झाली आहे. सकाळी वीआयएक्स अस्थिरता निर्देशांक ०.११% वर बंद झाला जो अंतिम सत्रात ०.०२% वर बंद झाला आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सकाळप्रमाणेच किंबहुना कालप्रमाणे संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय दबावाबरोबरच निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील शेअर्सची वैयक्तिक कामगिरी व तिमाहीतील निकाल या बदलांमुळे त्यांचा परिणाम निर्देशांकातील पातळीत झाला होता.
आज सर्वाधिक वाढ सकाळप्रमाणेच रिअल्टी (१.२१%), हेल्थकेअर (०.१८%), मिडस्मॉल हेल्थकेअर (०.३०%), एफएमसीजी (०.२८%), फार्मा (०.३८%) समभागात झाली आहे. सर्वाधिक घसरण आयटी (०.३९%), फायनांशियल सर्व्हिसेस २५/५० (०.३३%), पीएसयु बँक (०.७९%), खाजगी बँक (०.५८%) समभागात झाली. आज शेअर बाजारातील बीएसई (BSE) एक्सचेंज मध्ये ४१९९ समभागापैकी २००७ समभागात वाढ झाली आहे तर २०४० समभागात घसरण झाली आहे. एनएसई (NSE) एक्सचेंजमध्ये ३०२३ समभागापैकी १४३३ समभागात वाढ झाली असून १५०३ समभागात घसरण झाली आहे. खासकरून एनएसईत ८९ समभाग (Shares) अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत.
प्रामुख्याने पहिल्या तिमाहीतील संमिश्रित निकाल (ज्यामध्ये अधिकतम कंपन्याची असमाधानकारक कामगिरी), वाढलेले मूल्यांकन आणि परकीय भांडवलाचा घटलेल्या प्रवाहामुळे (FII Outflow) यामुळे बाजारातील भावना कमकुवत राहिल्या ज्याचा फटका किरकोळ घरगुती गुंतवणूकदारांना अधिक प्रमाणात बसला आहे. आजही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात आपली गुंतवणूक काढून घेतल्याची शक्यता असल्याने या मुद्यांने बाजारातील घसरणीला हातभार लावला. दुसरीकडे बाजारात आज कुठलेही विशेष 'ट्रिगर' नसल्याने बाजारात गुंतवणूकदारांचा तितकासा उत्साह जाणवला नाही. सेन्सेक्समधील महत्वाच्या ब्लू चिप्स कंपन्या इन्फोसिस, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँकेतील घसरणीमुळे आज निर्देशांक गारद झाला. दुसरीकडे युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने विविध विधाने टेरिफविषयी करत असल्याने बाजारातील गुंतवणूकदारांना कुठलीही निश्चिती मिळाली नाही. मात्र ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांना पदच्युत करणार नसल्याचे सां गितल्यानंतर सोने, तेल, चांदी आंतरराष्ट्रीय बाजारात वधारले होते. ट्रम्प यांनी 'लवकरच भारताबरोबर डील करू' असे वक्तव्य करून बाजाराला आशावादी केले असले तरी देखील वाढलेली महागाई, युएसमधील ट्रम्प प्रशासनाचे फेडशी असलेले वाद, त्यातून व्या जदरात कपातीवरील अनिश्चितता या कारणांमुळे बाजार आजही आश्वासक नाही. अमेरिकेतील आयटी कंपन्यांचेही निकाल आश्वासक नाही ज्याचा फटका भारतीय बाजारपेठेत होऊ शकतो.
पहिल्या तिमाहीतील नफा हा बाजारातील सध्या एकच प्रमुख ट्रिगर आहे, एक्सिस बँक, जिओ फायनान्शियल, एलटीआय माइंडट्री, विप्रो, एचडीएफसी एएमसी आणि इंडियन हॉटेल्सचे निकाल आज जाहीर होणार आहेत. त्यावर बाजाराचील पुढी दिशा अवलंबून असेल. डेरिव्हेटिव्ह्ज विभागात, पुट-कॉल रेशो (पीसीआर) ०.८० पर्यंत वाढला आहे जो बाजारातील अपवादात्मक परिस्थिती अधोरेखित करत आहे. तथापि, सतत एफपीआय शॉर्ट पोझिशन्स आणि कमी अस्थिरता (इंडिया VIX Volatility) २.०९% पेक्षा खाली राहिल्याने गुंतवणूकदार डोळ्यात तेल घालून व्यवहार अथवा गुंतवणूक करत आहेत हे यामधून स्पष्ट झाले आहे. आज अमेरिकेप्रमाणे आयटी (१.३९%), व पीएसयु बँक (०.७९%)समभागात नुकसान झाल्याने बाजारातील सपोर्ट लेवल राखणे गुंतवणूकदारांनाही शक्य झाले नाही.
आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ थरमॅक्स (६.४८%),एडब्लूएल अँग्री बिझनेस (६.०६%), आर आर केबल्स (४.८४%),झायडस वेलनेस (४.७७%), आलोक इंडस्ट्रीज (५.९२%),कजारिया सिरॅमिक्स (३.३३%), स्टार सिमेंट (३.८७%), बालकृष्ण इंडस्ट्रीज (३.१४%),एचडीएफसी एएमसी (२.८६%), टाटा कम्युनिकेशन (०.५४%), टाटा कंज्यूमर प्रोडक्ट (२.२५%), वरूण बेवरेज (२.०९%), सीजी पॉवर (२.०७%), जिंदाल स्टील (२.०४%), झायडस लाईफ सायन्स (१.४३%), हिंदाल्को (१.१७%), अदानी ग्रीन एनर्जी (१.११%), सिमेन्स (०.६८%), ट्रेंट (०.६६%), टायटन (०.४७%) समभागात झाली. अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण न्यूजेन सॉफ्टवेअर (६.०३%), जेपी पॉवर वेचंर (४.२९%), नेटवर्क १८ मिडिया (३.७४%), भारत डायनामिक्स (३.२८%),टेक महिंद्रा (२.७५%), बीएसई (२.१८%), इंटरग्लोब एव्हिऐशन (२.५८%), वारी इंडस्ट्रीज (२.५७%), मा झगाव डॉक (१.९२%), हिंदुस्थान एरोनॉटिक्स (१.६९%), इंडसइंड बँक (१.६७%), इन्फोसिस (१.५२%), एक्सिस बँक (०.७४%), वेदांन्ता (०.६९%), एचडीएफसी बँक (०.४७%), बजाज फिनसर्व्ह (०.४७%), जिओ फायनाशिंयल (०.४४%), कॅनरा बँक (१.२८%) एचसीएल टेक्नॉलॉजी (१.२१%), आयसीआयसीआय लोंबार्ड (१.११%), विप्रो (०.८४%) समभागात झाली.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' अमेरिकेतील टॅरिफ परिस्थितीबद्दलच्या सततच्या चिंतेमुळे गुंतवणूकदारांच्या भावना सावध झाल्यामुळे गुरुवारी इक्विटी बेंचमार्क सेन्सेक्स आणि निफ्टीने सुरुवातीच्या वाढीला मागे टाकले आणि ते खाली बंद झाले. निफ्टी ५० हा निर्देशांक मजबूत पातळीवर उघडला परंतु उच्च पातळी राखण्यात अपयशी ठरला आणि सत्रादरम्यान तो घसरला आणि आठवड्याच्या समाप्तीच्या दिवशी १०० अंकांनी किंवा ०.४% ने घसरून २५१११ वर बंद झाला. क्षेत्रीय आघाडीवर, कामगिरी मिश्रित होती आयटी आणि पीएसयू बँक समभाग सर्वाधिक तोट्यात होते, ०.८% आणि १.४% च्या दरम्यान घसरले. याउलट, एफएमसीजी, धातू, ग्राहकोपयोगी वस्तू आणि रिअल्टी निर्देशांक ०.५% आणि १% च्या दर म्यान वाढले. व्यापक बाजारपेठेत, निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक दोन्ही अनुक्रमे ०.१७% आणि ०.१२% ने घसरले.'
आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' निफ्टी निर्देशांकाने २० दिवसांच्या EMA (Exponential Moving Average EMA) पासून कमी उच्च आणि कमी कमी नफा बुकिंग दर्शविणारा मंदीचा कॅंडल स्टिक पॅटर्न तयार केला. आधी सांगितल्याप्रमाणे, निर्देशांकात उथळ रिट्रेसमेंट दिसून आला आहे, जो त्याच्या मागील वाढीच्या फक्त ५०% सुधारणा करतो. हा सौम्य परतावा, वाढीव वेळेच्या सुधारणांसह, २५००० पातळीच्या प्रमुख आधाराजवळील रचनात्मक रचना आणि उच्च आधाराची निर्मिती दर्शवितो. गेल्या तीन सत्रांमध्ये निर्देशांक २० दिवसांच्या EMA ने २५२५० पातळीच्या आसपास ठेवलेल्या प्रतिकाराचा सामना करत आहे, फक्त त्याहून वरची हालचाल येत्या आठवड्यात २५३५० आणि २५६०० पातळीच्या दिशेने आणखी वर उघडेल. तथापि, २५२५० प्रतिकारांना (Resistance) खात्रीशीरपणे पार करण्यात अयशस्वी झाल्यास २५०००-२५२५० श्रेणीत आणखी एकत्रीकरण होऊ शकते. आधी सांगितल्याप्रमाणे, प्रमुख आधार (Support Zone) २४९००-२५१०० झोनमध्ये ठेवला आहे.'
आजच्या बँक निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' बँक निफ्टीने उच्च पातळीवर नफा बुकिंगचे संकेत देणारी एक मोठी मंदीची मेणबत्ती तयार केली. गेल्या १० सत्रांमध्ये अपेक्षित रेषांवर निर्देशांक ५६५००-५७६०० पातळीच्या श्रेणीत एकत्रित होताना दिसत आहे. आम्हाला अपेक्षा आहे की निर्देशांक हाच विस्तार करेल आणि या श्रेणीच्या पलीकडे जाणे निर्देशांकातील पुढील दिशात्मक हालचालीचे संकेत देईल. प्रमुख अल्पकालीन आधार ५६०००-५५५०० क्षेत्रावर ठेवण्यात आला आहे, जो ५०-दिवसांच्या EMA आणि प्रमुख रिट्रेसमेंट पातळीचा संगम दर्शवितो. व्यापक कल सकारात्मक राहतो आणि सध्याच्या एकत्रीकरणाकडे (Consolidation) खरेदीच्या संधी म्हणून पाहिले पाहिजे.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,' भारतीय इक्विटी बेंचमार्क्स किरकोळ घसरणीसह बंद झाले कारण गुंतवणूकदारांनी विशेषतः तंत्रज्ञान आणि बँकिंग क्षे त्रातील मंदावलेल्या पहिल्या तिमाहीतील उत्पन्नाच्या घोषणांमध्ये सावधगिरी बाळगली. लार्जकॅप स्टॉक्सच्या वाढत्या मूल्यांकनामुळे आणि अमेरिका-भारत व्यापार कराराच्या अनिश्चिततेमुळे एफआयआय बहिर्गमनमुळे बाजारातील सहभागी बाजूला राहिले, तथा पि, कोणत्याही सकारात्मक घडामोडी बाजारातील भावना वाढवू शकतात. मंद ट्रेंड असूनही, मजबूत देशांतर्गत तरलता आणि रिअल्टी आणि उपभोग थीम स्टॉक्समध्ये निवडक खरेदीमुळे घसरणीला मर्यादा घालण्यास मदत झाली, ज्यामुळे व्यापक बाजार एका श्रेणीबद्ध टप्प्यात राहिला. जीडीपी वाढ आणि स्थिर चलनवाढीचा कल यासारख्या देशांतर्गत मॅक्रो फंडामेंटल्स मध्यम ते दीर्घकालीन आधारभूत राहतात.'
निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तंत्रज्ञान विश्लेषक रूपक डे म्हणाले की,'निफ्टी दिवसभर विक्रीच्या दबावाखाली राहिला कारण निर्देशांक २५२६० पातळीच्या महत्त्वपूर्ण प्रतिकार पातळीच्या पुढे जाऊ शकला नाही, ज्यामुळे बराच काळ विश्रांती घेतली गेली. तासिक चार्टवर, एक एकत्रीकरण ब्रेकआउट दिसून येत आहे, जो कमकुवत तेजीचा वेग दर्शवितो. सध्याची भावना मंदीची दिसते आणि अल्पावधीत निफ्टीला २४९२०-२४९०० झोनकडे ओढू शकते. वरच्या बाजूस २५२६० हा एक मज बूत प्रतिकार राहण्याची शक्यता आहे.' रुपयांच्या मूल्यांकबाबत भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष राहुल विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,'डॉलर निर्देशांकाला ९८.७० च्या जवळ आधार मिळाल्याने रुपया ०.१२% ने कमकुवत होऊन ८६.०२ वर व्यवहार करत होता. देशांतर्गत भांडवली बाजारातील कमकुवतपणाचाही रुपयावर परिणाम झाला. चलनाला ८५.५० च्या पातळीजवळ प्रतिकाराचा सामना करावा लागत आहे आणि त्या क्षेत्राच्या वर टिकून राहण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागत आहे. पुढे जाऊन, रुपया ८५.७५ ते ८६.२५ पातळीच्या श्रेणीत व्यापार करण्याची अपेक्षा आहे.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'निफ्टीने २५२३० वर सुरुवात केली, काही काळासाठी २५२३८ च्या उच्चांकाला स्पर्श केला आणि नंतर अस्थिरता वाढली, ज्यामुळे निर्देशांक २५१३५ च्या इंट्राडे नीचांकी पातळीवर घसरला. दिवसाच्या व्यवहारात भावनांमध्ये जलद बदल दिसून आला, सुरुवातीच्या आशावादामुळे अशांततेला पर्याय मिळाला. क्षेत्रीयदृष्ट्या, रिअल्टी, धातू, ग्राहक टिकाऊ वस्तू आणि फार्मा या क्षेत्रांमध्ये मजबूतीचे घटक उदयास आले कारण या क्षेत्रांनी व्यापक बाजारातील गोंधळात चांगली कामगिरी केली. याउलट, आयटी, बँकिंग आणि वित्तीय सेवा दबावाखाली होत्या, अनिश्चिततेमुळे ते दबले गेले होते.
जागतिक स्तरावर, फेडरल रिझर्व्हच्या नेतृत्वातील संभाव्य बदलाभोवतीच्या अटकळांमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास अस्थिर राहिला - ही अफवा अध्यक्ष ट्रम्प यांनी नाकारली होती परंतु तरीही भावनांवर सावली पडली. चालू अमेरिका-भारत व्यापार वाटाघाटींमुळे अतिरिक्त सावधगिरी बाळगली गेली, ज्यामुळे बाजारातील सहभागींमध्ये बचावात्मक भूमिका निर्माण झाली.डेरिव्हेटिव्ह्जच्या बाबतीत, अँडव्हान्स-डिकलाइन रेशो सकारात्मक राहिला आणि आरबीएल बँक, बालकृष्ण इंडस्ट्रीज, एचडीएफसी एएमसी, टेक महिं द्रा आणि सोना कॉमस्टारमध्ये लक्षणीय ओपन इंटरेस्ट बिल्डअप दिसून आले, जे बाजारातील अस्थिर परिस्थितीमध्ये निवडक क्रियाकलापांचे संकेत देते.'
आज सोन्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्देशांकातही मोठी चढउतार राहिली काल सोन्यात घसरण झाल्यानंतर अस्थिरतेच्या कारणामुळे सकाळी पुन्हा सोने वाढले होते. मात्र फेड गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांना निष्कासित करणार नसल्याचे स्पष्ट केल्याने सोन्यात पुन्हा घसरण झाली. गेल्या महिनाभरात भूराजकीय कारणांमुळे सोने संवेदनशील स्थितीत परिक्रमण करत आहे. संध्याकाळपर्यंत सोन्याच्या निर्देशांकात ०.८३% घसरण झाली आहे. संध्याकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या निर्देशांकातही चढउतार सातत्याने सुरु आहे. आज कच्च्या तेलाच्या प्रति बॅरेल किंमतीत सकाळी घसरण झाली मात्र डॉलरच्या पातळीत वाढ झाल्याबरोबर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलात संध्याकाळपर्यंत पुन्हा वाढ झाली आहे. जागतिक व्यापार तणाव कमी होत असतानाही गुरुवारी तेलाच्या किमती वाढल्या, तर विश्लेषकांनी कमी इन्व्हेंटरी आणि मध्य पूर्वेतील जोखीम हे बाजाराला आधार देणारे घटक असल्याचे सांगितले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की १५० लहान देशांना त्यांच्या यूएस टॅरिफ दरांबद्दल सूचित करणारे पत्र लवकरच जारी केले जाईल आणि त्यांनी बेकायदेशीर औषधांवर बीजिंगशी करार आणि युरोपियन युनियनशी संभाव्य करार होण्याची श क्यता देखील दर्शविली आहे. मध्यपूर्वत इस्त्राईलने सिरियावर हल्ला केल्याने या सगळ्या घटनांचा परिपाक म्हणून पुन्हा कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ होत आहे. संध्याकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या WTI Future निर्देशांकात ०.४७% वाढ झाली असून Brent Fut ure निर्देशांकात ०.१३% वाढ झाली आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची १२ पैशाची वाढ झाल्याने काही प्रमाणात भारतीय बाजाराला दिलासा मिळाला असला तरी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार यांच्याकडून सतत काढली जात असलेली रोख गुंतवणूक हा भारतीय गुंतवणूकदारांच्या दृष्टीने चिंताजनक निश्चित आहे. उद्याच्या सत्रात संध्याकाळपर्यंत प्रसिद्ध होणारा तिमाही निकाल, आयटीतील कामगिरी व क्षेत्रीय विशेष समभागात कामगिरी हेच नवे ट्रिगर बाजारात असू शकतात.