Friday, October 24, 2025
Happy Diwali

Ashish Shelar : दत्ताजी नलावडे यांच्या शिवालयासाठी १ कोटीचा निधी मंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेत घोषणा

Ashish Shelar : दत्ताजी नलावडे यांच्या शिवालयासाठी १ कोटीचा निधी मंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेत घोषणा

मुंबई : शिवसेनेचे दिवंगत नेते दत्ताजी नलावडे यांच्या वरळी येथील "शिवालय" या लोक सेवाकेंद्राला १ कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत केली. दत्ताजी नलावडे यांनी आपल्या वरळी विधानसभा मतदारसंघात शिवालय नावाचे लोकसेवा केंद्र सुरु केले होते त्याची इमारत जिर्ण झाली असून त्याची डागडुजी व सेवासुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी करीत भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्याला गट नेते प्रविण दरेकर यांनी पाठींबा दिला. तर मुंबई महापालिकेतर्फे या इमारतीच्या दुरुस्तीचे काम होती घेण्यात आल्याचे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. मात्र त्या व्यतिरिक्त अन्य सुविधांसाठी निधी द्या अशी मागणी सदस्यांनी सरकारकडे केली.

त्याला उत्तर देताना मंत्री एँड आशिष शेलार म्हणाले की, शिवसेना नेते दत्ताजी नलावडे हे नगरसेवक आणि महापौर देखील होते. इतकेच नाही तर संयुक्त महाराष्ट्र आणि गोवामुक्ती या दोन्ही चळवळींमध्ये दत्ताजी नलावडे यांचे योगदान मोठे आहे. कामगार, क्रिडा, साहित्य, कला या प्रत्येक क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. खरं म्हणजे त्यांनी बांधलेल्या शिवालयाला उतरती कळा लागणे हेच अशोभनिय आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मुंबईच्या अभिमानाचे स्थान असलेल्या दत्ताजी नलावडे यांच्या शिवालयाला १ कोटी निधी देण्याबाबत येईल, अशी घोषणा मंत्री शेलार यांनी दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >