Sunday, August 10, 2025

Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : आव्हाड-पडळकर कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची, शेवटी घमासान हाणामारी!

Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : आव्हाड-पडळकर कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची, शेवटी घमासान हाणामारी!

मुंबई : विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आता विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या घटनेबाबत सविस्तर अहवाल मागवला आहे.



नेमकं प्रकरण काय घडलं?


विधानभवनाच्या पायऱ्यांवर दोन्ही नेत्यांचे समर्थक आपापल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी करत होते. यावेळी आव्हाड आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि पाहता पाहता त्याचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांना हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. या घटनेनंतर सभागृहातही पडसाद उमटले. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, विधानसभा अध्यक्षांनी तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या अहवालानंतर संबंधित कार्यकर्त्यांवर आणि दोषींवर काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवनाच्या परिसरात गोपिचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोर म्हणून डिवचल्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती. त्यानंतर काल गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड आमने-सामने आले असता दोन्हीकडून एकमेकांना शिविगाळ करून धमकावण्यात आले होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या आवारातच एकमेकांना भिडल्याने या वादाने गंभीर वळण घेतलं आहे.

Comments
Add Comment