भारतातील कमोडिटी बाजारातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) मध्ये सोन्याच्या निर्देशांकात ०.५०% घसरण झाली ज्यामध्ये दरपातळी ९७२९५.०० रुपयांवर गेली आहे. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरांत २४ कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम दर ९९३३ रूपये, २२ कॅरेट सोन्यासाठी ९१०५ रूपये, १८ कॅरेट सोन्यासाठी ७५०० रूपये सुरू आहे. मात्र जागतिक बाजारपेठेत ट्रम्प यांनी पुन्हा आपल्या निवेदनातून फेडरल रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांना आपण पदच्युत करणार नसल्याचे सांगितल्यानंतर पुन्हा बाजारात घसरण झाली ज्यात मोठ्या प्रमाणात अस्थिरता स्पष्टपणे जाणवते आहे. सततच्या डॉलर वाढीमुळे सोने महागत असतानाच कच्चे तेल व डॉलरही आज स्वस्त झाले. परिणामी रूपयांच्या तुलनेत डॉलर घसरल्याने बाजारातील सोन्याने पातळी अति उच्चांकी गाठली नाही.
आज जागतिक सोने परिषदेने (World Gold Council) नक्की काय म्हटले?
२०२५ च्या दुसऱ्या सहामाहीत सोन्याच्या किमतीत ०-५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे असे जागतिक सुवर्ण परिषदेने (WGC) म्हटले आहे. यावरून व तज्ञांच्या मतानुसार सोन्याच्या किमतीत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे हे अधोरेखित होत आहे. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने आपला सविस्तर अहवाल जाहीर केला त्यामध्ये नेमके म्हटले आहे की,' आमच्या सुवर्ण मूल्यांकन चौकटीवर आधारित आमचे विश्लेषण असे सूचित करते की, प्रमुख मॅक्रो व्हेरिएबल्ससाठी सध्याच्या सर्वसमावेशक अपेक्षांनुसार, दुसऱ्या सहामाहीत सोने रेंजबाउंड (Rangebound) राहू शकते, जे सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे ०-५ टक्क्यांनी जास्त असू शकते, जो २५-३० टक्के वार्षिक परतावा (Annual Return) आहे,' असे त्यांनी आपल्या Gold Mid Year Outlook 2025' या त्यांच्या अहवालात नमूद केले आहे. हे विश्लेषण अर्थशास्त्रज्ञ आणि बाजारातील सहभागींच्या मॅक्रो-अंदाजांवर आधारित आहे. 'तथापि, अर्थव्यवस्था क्वचितच सहमतीनुसार कामगिरी करते.' असेही सोने उत्पादकांची संस्था WGC ने म्हटले आहे.
२०२५ मध्ये २६% वाढ -
२०२५ च्या दुसऱ्या सहामाहीत सोन्याचा भाव जो वर्षाच्या सुरुवातीपासूनच २६% वाढला आहे. अहवालातील निरीक्षणानुसार, कमकुवत अमेरिकन डॉलर, सततचा भू-राजकीय धोका, गुंतवणूकदारांची मागणी वाढवणे आणि मध्यवर्ती बँकेच्या सततच्या खरेदीमुळे झाला आहे. “यापैकी काही घटक कायम राहण्याची अपेक्षा असली तरी, पुढे जाण्याचा मार्ग व्यापार तणाव, चलनवाढ गतिमानता आणि चलनविषयक धोरणासगट अनेक अंतर्बाह्य घटकांवर अवलंबून आहे.'असे डब्ल्यूजीसीने म्हटले आहे.
जर आर्थिक परिस्थिती बिघडली व स्थिर चलनवाढीचा दबाव आणि भू-आर्थिक तणाव वाढला, तर सोन्याची मागणी लक्षणीयरीत्या वाढू शकते. यामुळे सोन्याच्या किमती सध्याच्या किमतींपेक्षा १०-१५ टक्क्यांनी वाढू शकतात असा परिषदेचा अंदाज आहे. 'घसरणारे व्याजदर आणि सततची अनिश्चितता गुंतवणूकदारांची इच्छा कायम राहू शकते. विशेषतः सोने (ETF (Exchange Traded Fund) आणि OTC व्यवहारांद्वारे).त्याचवेळी, मध्यवर्ती बँकेची (Central Bank )मागणी २०२५ मध्ये मजबूत राहण्याची शक्यता जी २०२२ पूर्वीच्या सरासरी ५००-६०० टनांपेक्षा खूपच जास्त राहून मागील विक्रमांपेक्षा कमी राहील' असे WGC ने अहवालात म्हटले आहे.
मागणीवर भाष्य करताना परिषदेने म्हटले आहे की, 'तथापि, वाढलेल्या सोन्याच्या किमती ग्राहकांच्या मागणीला आळा घालत राहतील आणि पुनर्वापराला प्रोत्साहन देतील अशी शक्यता आहे. हे सोन्याच्या मजबूत कामगिरीला अडथळा म्हणून काम करेल.
चिनी विमा कंपन्यांसारख्या नवीन संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या योगदानामुळे सोन्याला अंशतः पाठिंबा मिळू शकतो. अधिक अस्थिर भू-राजकीय आणि भू-आर्थिक परिस्थिती सोन्याला लक्षणीयरीत्या वाढवू शकते, विशेषतः जर अधिक लक्षणीय स्टॅगफ्लेशन किंवा मंदीचे धोके प्रत्यक्षात आले आणि सुरक्षित-निवासस्थान असलेल्या मालमत्तेसाठी गुंतवणूकदारांची अपेक्षा वाढली आहे असे मत परिषदेने मांडले.अहवालातील अंतिम व महत्वाचे निरिक्षण म्हणजे, 'एकूणच, जागतिक अर्थव्यवस्थेचा अंदाज घेण्याच्या अंतर्गत मर्यादा लक्षात घेता, आम्हाला विश्वास आहे की सोने सध्याच्या मॅक्रो लँडस्केपमध्ये रणनीतिक आणि धोरणात्मक गुंतवणूक निर्णयांना समर्थन देण्यासाठी त्याची मूलभूत तत्वे चांगल्या स्थितीत आहेत' असे WGC ने अखेरीस म्हटले आहे.
एकूणच जागतिक स्थिती पाहता ही अस्थिरता मोठ्या प्रमाणात वाढू शकते. रूपयाचे अवमूल्यन मोठ्या प्रमाणात झाल्यास मात्र सोन्याच्या बेसलेवलला धक्का बसू शकतो. मात्र दुसरीकडे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार व घरगुती गुंतवणूकदार यांच्या इटीएफ (ETF) मधील कामगिरीवर अनेक गोष्टी अवलंबून असू शकतात.