Monday, August 11, 2025

गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय? तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय? तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी
मुंबई : कोकण म्हटला की वर्षातला मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. गणपतीला गावी जायचं या एका ओढीवर कोकणी माणूस गणेशोत्सवाची वर्षभर वाट बघत असतो. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांची गर्दी प्रचंड असते. त्यातच मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. जोगेश्वरी येथील गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणातील चाकरमान्यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोफत बस सेवा दिली जाणार आहे.

जोगेश्वरी येथील नागरिकांसाठी गणेशोत्सवास कोकणात जाण्यासाठी भारतीय जनता पार्टी ने ज्या बसचे आयोजन केले आहे ती बस दिनांक २३ ते २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता वनराई कॉलनी येथून सुटणार आहे.

हा उपक्रम गेले पाच वर्ष सुरू असून माजी जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर हे राबवीत असल्याचे मंडळ अध्यक्ष संतोष झगडे यांनी सांगितले.
Comments
Add Comment