Sunday, August 10, 2025

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघात, ST - मिनी बसचा चेंदामेंदा, १९ जखमी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघात, ST - मिनी बसचा चेंदामेंदा, १९ जखमी

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी जवळ एसटी बस आणि खासगी मिनी ट्रॅव्हल्स यांची समोरासमोर टक्कर झाली. अपघातात दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला. या अपघातात १९ प्रवासी जखमी झाले. मिनी ट्रव्हल्स चालक गंभीर जखमी आहे. स्थानिक आणि संगमेश्वर पोलीस यांनी तातडीने मदतकार्य केले. एसटीतील सहा आणि मिनी बसमधील १३ जण जखमी झाले.


मुंबई गोवा महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. जखमी झालेले सगळे प्रवासी चिपळूण रत्नागिरी संगमेश्वर परिसरातील आहेत. या सगळ्या प्रवाशांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संगमेश्वर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही सुरू असून अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत. मिनी बस चालक गंभीर असल्याने त्याला रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे. तर अन्य दोघांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


जखमी झालेल्यांपैकी १६ जणांची नावं कळली आहेत. इतर तीन जणांची नावं अद्याप समजलेली नाही.


जखमींची नावं :


1) विजय विश्वनाथ प्रसादे (साठ, रामपेठ, संगमेश्वर),


2) अजय रामदास भालेराव (चाळीस, एस. टी. चालक, सध्या चिपळूण, मूळ जळगाव ),


3) रघुनाथ दत्तात्रय फाटक (चौतीस, कसबा, संगमेश्वर),


4) अमृता श्रीकांत साठे (बावन्न, चिपळूण, एस. टी बस)


5) आहरत संतोष सावंत (पंधरा, पाली)


6) आण्णा बाबासाहेब पवार (तेहतीस, पाली, मराठवाडी, रत्नागिरी)


7) सुशील धोंडीराम मोहिते (पस्तीस, वांद्री, संगमेश्वर)


8) सविता धोंडीराम मोहिते (पासष्ट, वांद्री, संगमेश्वर)


9) सहारा हमीद फकीर (बावीस, शेट्येनगर, रत्नागिरी)


10) केतन श्रीकृष्ण पवार (चौतीस, कुवारबाव, जागुष्ट कॉलनी, रत्नागिरी)


11) शेखर सतीश साठे (बत्तीस, डिप्लोमा फायरमन, रत्नागिरी)


12) सिद्धार्थ गोपाळ सावंत (चौऱ्याहत्तर, पाली, वळके,रत्नागिरी )


13) अनिरुद्ध शिवाजी धनावडे (त्रेपन्न, मारुती मंदिर, रत्नागिरी)


14) अंकिता अनंत जोगळे (चाळीस, माखजन, संगमेश्वर)


15) वैशाली सिद्धार्थ सावंत (साठी, पाली वळके)


16) उमर आफ्रिन मुलानी (पंचवीस, कसबा, संगमेश्वर)


Comments
Add Comment