Friday, August 15, 2025

उदयनराजे भोसले यांच्या नावाने आमिर खानची फसवणूक

उदयनराजे भोसले यांच्या नावाने आमिर खानची फसवणूक

मुंबई: आतापर्यंत मोठमोठ्या सेलिब्रेटींची विविध पद्धतीने फसवणूक झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यातच आता बॉलिवूडचा खान आमिर खानचीही फसवणूक केली जात असल्याची घटना समोर आली आहे.

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नावाने आमिर खानची फसवणूक केली जात होती. या प्रकरणी अली अमानत शेर या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

या आरोपीने आमिर खानला मी, सातारा येथून उदयनराजे भोसले बोलत आहे. माझे काही लोक तुम्हाला भेटायला येतील. त्यांची मदत करा. असे सांगितले. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याचे हे प्रकार सुरू होते. जानेवारीपासून तो अशा युक्त्या करून लोकांची फसवणूक करत होता.

दरम्यान, वेळीच सावध झालेल्या आमिर खानने उदयनराजे यांचे निकटवर्तीय पंकज चव्हाण यांच्यांशी संपर्क केला. त्यानंतर हा फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला. फसवणुकीची ही घटना समोर आल्यानंतर आमिरने तातडीने पोलिसांची मदत घेतली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा