मोहिनीच्या जाळ्यात अडकणार का जगदंबा? ‘आई तुळजाभवानी’ मध्ये येणार धक्कादायक वळण!

मुंबई: कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘आई तुळजाभवानी’ आता एका अत्यंत भावनिक आणि नाट्यमय वळणावर येऊन पोहोचली आहे. येत्या १८ जुलै रोजी रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर प्रसारित होणाऱ्या भागात एका धक्कादायक कटाचा खुलासा होणार आहे.


जगदंबा हीच मोह आणि क्रोधची हरवलेली मुलगी आहे का? मोहिनी जगदंबालाच आपली हरवलेली मुलगी म्हणून गावकऱ्यांना सांगते आणि या कथेतले नवे नाट्य उलगडू लागते. तुळजाचे मानवी बालरूप असलेल्या जगदंबाच्या आजूबाजूच्या मंडळींना मोहाच्या जाळ्यात अडकवून तिला महिषासुरासमोर हजर करण्याची कपटी योजना मोहिनीने आखली आहे. तेव्हा, मोहिनीची मोहरुपी माया जगदंबाला तिच्या जाळ्यात अडकवेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


भिंगार गावात एक अनोखा गोंधळ उडणार आहे, जेव्हा भिल्ल वेशातील एक महिला मोहिनी (मोहरुपी माया) आणि तिचा नवरा इंगळोजी (क्रोध) नाट्यमयरित्या प्रवेश करतात. मोहिनी जीवाच्या आकांताने “वाचवा! वाचवा! ह्यो माणूस माझा जीव घेईल...” असा आरडाओरडा करत असते. क्रोध तिच्यावर आरोप करतो की तिच्यामुळे त्यांची मुलगी हरवली आणि तिचा जीव घेण्याचा इशाराही देतो. मोहिनी मात्र गावकऱ्यांपुढे गयावया करून सांगते की तिने कोणतीही चूक जाणूनबुजून केलेली नाही. ती गावात एक परडी हरवल्याचे सांगते आणि रडत्या स्वरात विचारते, “कुणी पाहिली का हो ती परडी? माझ्या काळजाचा तुकडा त्यात होता...”


ही सगळी धावपळ आणि अश्रूंनी भरलेली याचना बघून गावकरी हादरतात. याच वेळी, सुंदराला काहीतरी आठवते. तिला स्मरते, की काही काळापूर्वी तिची भेट मायाशी झाली होती, जिने तिला सांगितलं होतं की तिच्या बहिणीची एक परडी या गावात राहिली असून त्यात एक मौल्यवान गोष्ट आहे. हे आठवताच क्षणी सुंदरा म्हणते, “मी पाहिली आहे ती परडी...!” सगळ्यांच्या नजरा तिच्यावर स्थिरावतात. मोहिनी धावत सुंदरापाशी येते, तिला विचारते – “माझी लेक कुठाय...?” आणि मग सुंदरा एका दिशेने बोट दाखवते. तिकडे उभी आहे जगदंबा.


“परडीमध्ये सापडलेली आणि गावात बाहेरून आलेली एकच पोरगी हाय हितं... जगदंबा! हीच तुमची पोरगी हाय...!”


या धक्कादायक वळणानंतर पुढे मालिकेत काय घडणार, जगदंबा मोहिनीच्या मोहरुपी मायेला बळी पडणार का, आणि तुळजाभवानी कशी या संकटातून मार्ग काढणार, हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा, ‘आई तुळजाभवानी’ 18 जुलै, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर.

Comments
Add Comment

दीपिका करणार कमबॅक! २०२६ मध्ये बिग बजेट चित्रपटांमधून झळण्याची शक्यता

मुंबई: बॉलीवूडची ग्लॅम अभिनेत्री दीपिका पादुकोण २०२५ मध्ये अनेक वादांमध्ये अडकली. तिच्या आठ तास काम करण्याच्या

'इक्किस' चित्रपटात दिसलेला अगस्त्य नंदा आणि बच्चन कुटुंबियांचे नाते काय?

मुंबई: भारतीय सिनेसृष्टीत हि-मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांचा देशभक्तीपर इक्कीस हा शेवटचा चित्रपट

‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’ची स्टार कास्ट ‘कौन बनेगा करोड़पति’च्या सेटवर

मुंबई : आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी मनोरंजक चित्रपट हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस आपल्या खास ऊर्जा आणि खुमासदार

‘हक़’च्या यशानंतर यामी गौतम धरचं मन जिंकणारं वक्तव्य

या वर्षी दमदार अभिनय आणि मोठ्या पडद्यावर लक्षात राहणाऱ्या क्षणांनी भरलेल्या सिनेमांमध्ये एक नाव सातत्याने

मुखवट्यामागील गडद रहस्य ‘केस नं. ७३’

प्रत्येक चेहऱ्यावर एक मुखवटा असतो आणि या मुखवट्यामागे असतात सुखदुःखाच्या असंख्य मानवी भावभावना.. ज्या आपल्याला

हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान... उत्तम संगीत आणि नखरेल अदाकारीने सजलेली लावणी रसिकांना घायाळ केल्याशिवाय राहत