Wednesday, August 13, 2025

NCPचे नेते जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात जोरदार शा‍ब्दिक चकमक

NCPचे नेते जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात जोरदार शा‍ब्दिक चकमक

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप कत आहेत. मात्र आता ही शा‍ब्दिक चकमक शिवीगाळपर्यंत पोहोचली आहे. विधानभवनाच्या बाहेर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील शिवीगाळचा व्हिडिओ समोर आला आहे.


गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांदरम्यान वातावरण गरम झाले होते. काही दिवसांआधी विधान भवन परिरात जाताना जितेंद्र आव्हाडांनी नाव न घेता गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी सोशल मीडयावर एकमेकांविरोधात मोर्चा खोलला होता.



गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद


मात्र आता हे प्रकरण सोशल मीडियावरून आता समोरासमोर वाद सुरू झाले आहेत. विधान भवनाच्या बाहेर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार वाद रंगला. ही घटना त्या वेळेस रंगली जेव्हा गोपीचंद पडळकर कारमधून उतरले आणि गाडीचा दरवाजा जोराने बंद केले. यावर जितेंद्र आव्हाड यांनी आरोप लावला की दरवाजा मुद्दामहून जोराने बंद केला. यामुळे त्यांना दुखापत झाली असती. यावर दोन्ही नेत्यांमध्ये शिवीगाळ आणि शा‍ब्दिक चकमक सुरू झाली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >