Saturday, August 16, 2025

मुंबईत इमारत कोसळून दहा जखमी

मुंबईत इमारत कोसळून दहा जखमी

मुंबई : मालाडच्या मालवणी भागात न्यू कलेक्टर कंपाउंड परिसरात प्लॉट २२ येथे असलेली इमारत कोसळली. या दुर्घटनेत दहा जण जखमी झाले. जखमी झालेल्यांपैकी सात जणांना प्रथमोपचारानंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. इतर तन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तळमजला आणि वर दोन मजले अशा स्वरुपाची इमारत मालवणीच्या न्यू कलेक्टर कंपाउंड परिसरात प्लॉट २२ येथे होती. ही इमारत कोसळली. या दुर्घटनेची चौकशी सुरू आहे.


Comments
Add Comment