मुंबई : महाराष्ट्र पोलीस सर्विस फॉर सिटीझेन पोर्टल या संकेतस्थळावर २०२४ ते २०२५ या कालावधीत १८ वर्षाखालील बेपत्ता मुलींची संख्या ४०९६ तर १८ वर्षावरील महिलांची संख्या ३३५९९ अशी दर्शवण्यात आली आहे. राज्यात महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढल्याची धक्कादायक कबुली मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली आहे. फक्त नागपूर शहरात जानेवारी २०२४ ते मे २०२५ अखेरपर्यंत एकूण ५८९७ जण बेपत्ता झाले आहेत. यामध्ये महिला व पुरुष ४९२३ बेपत्ता झाले आहेत, तर ७७६ मुली व मुले बेपत्ता झाले आहेत. २०२१ ते २०२५ या ४ वर्षाच्या कालावधीत अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि छेडछाडीचे एकूण १६१६० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
४ हजार ९६० महिला शोधून काढल्या
राज्यात हरवलेल्या महिला व बालकांना शोधण्यासाठी 'ऑपरेशन शोध' ही विशेष मोहीम प्रत्येक स्तरावर राबवण्यात आली आहे. ही मोहीम हातात घेतल्यानंतर १७ एप्रिल २०२५ ते १५ मे २०२५ या कालावधीत एका महिन्यात आपण ४ हजार ९६० महिला शोधून काढल्या आहेत. १३६४ बालके शोधून काढली आहेत. १०६ महिला आणि ७०३ बालके असे होते की ते रेकॉर्डवर नव्हते त्यांची कुठेच तक्रार नव्हती. आता हा सेल सुरू राहील. सगळ्या राज्यासाठी आम्ही एक पोर्टल तयार केलं आहे त्यावर राज्यभरातील माहिती भरली जाईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
PMJDY scheme: जुलैपर्यंत १.४ लाख जनधन योजनेअंतर्गत नव्या बँक खात्यांची भर
१ जुलैपर्यंत १.४ लाख नवी खाती उघडली - वित्त विभाग
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY) २८ ऑगस्ट २०१४ ...
'ऑपरेशन मुस्कान' अन् 'ऑपरेशन शोध' मोहीम राबवण्यात आली : मुख्यमंत्री फडणवीस
राज्यात हरवलेल्या महिला व बालकांच्या शोधासाठी १४ ऑपेरेशन राबावण्यात आली. त्यात ४११९३ लहान मुले व मुली यांचा शोध घेतला गेला. राज्यातील महिला आणि मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी महिला व बाल अपराध प्रतिबंध विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.
'ऑपरेशन मुस्कान' अन् 'ऑपरेशन शोध' उपक्रम सुरूच ठेवणार
हा एक चांगला उपक्रम आम्ही चालू केला आहे आणि हा उपक्रम सुरूच ठेवणार आहोत. सगळ्या राज्यांना या पोर्टलशी कनेक्ट केलेलं आहे. त्या पोर्टल वर सगळ्या राज्यांना आपली माहिती द्यायची आहे आणि त्या माहितीचं संकलन जो आपला वार्षिक रिपोर्ट येतो त्यामध्ये सुद्धा येईल, त्यादृष्टीने आपण केलेलं आहे. पण 'ऑपरेशन मुस्कान'च्या निमित्ताने या ठिकाणी त्याचाच एक सब ग्रुप म्हणून एक सब पार्ट म्हणून महिलांची फोकस माहिती आपल्याला देता येईल का यासंदर्भात निश्चितपाने कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिशषदेत म्हंटल आहे.