Wednesday, August 6, 2025

PMJDY scheme: जुलैपर्यंत १.४ लाख जनधन योजनेअंतर्गत नव्या बँक खात्यांची भर

PMJDY scheme: जुलैपर्यंत १.४ लाख जनधन योजनेअंतर्गत नव्या बँक खात्यांची भर
१ जुलैपर्यंत १.४ लाख नवी खाती उघडली - वित्त विभाग

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY) २८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरु झाली होती. बँकिंग सेवेपासून वंचित समुहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने हा योजनाबद्ध निर्णय घेतला होता. ज्याला गेल्या १० वर्षात मोठा प्रतिसाद मिळाला होता. याच धर्तीवर सरकारने नव्या खात्यांची ताजी आकडेवारी जाहीर केली आहे त्यातील माहितीनुसार, १ जुलैपासून देशभरात प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत (PMJDY) सुमारे १.४ लाख नवीन खाती उघडण्यात आली आहेत ' असे वित्तीय सेवा विभागाने (DFS) मंगळवारी सांगितले. या कालावधीत तीन जनसुरक्षा योजनांअंतर्गत ५.४ लाखांहून अधिक नवीन नोंदणी नोंदविण्यात आल्या आहेत असेही डीएफएस विभागाने म्हटले आहे. डीएफएसने त्यांच्या प्रमुख आर्थिक समावेशन योजना पीएमजेडीवाय, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आणि अटल पेन्शन योजना (APY) यांचा विस्तार करण्यासाठी १ जुलैपासून सुरू झालेली आणि ३० सप्टेंबरपर्यंत चालणारी तीन महिन्यांची देशव्यापी मो हीम राबवली आहे. प्रत्येक पात्र नागरिकाला या योजनांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी सर्व ग्रामपंचायती आणि शहरी स्थानिक संस्थांना कव्हर करण्याचे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

या मोहिमेच्या पहिल्या दोन आठवड्यात, लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी आणि आर्थिक साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये ४३,४४७ नावनोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत त्यापैकी आतापर्यंत ३१,३०५ शिबिरांचे प्रगतीचा अहवाल संकलित करण्यात आले आहेत. त्याच आधारावर सरकारने ही संबंधित माहिती दिली आहे. या उपक्रमाविषयी बोलताना,' हा उपक्रम शेवटच्या टप्प्यातील आर्थिक सक्षमीकरण आणि अधिक सामाजिक आर्थिक समावेशनासाठी सरकारची वचनबद्धता प्रतिबिंबित करतो ' असे अर्थ मंत्रालयाने आपल्या निवेदनात नुकतेच नमूद केले. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेरपर्यंत सुमारे २.७ लाख ग्रामपंचायती आणि शहरी संस्थांना या मोहिमेचा समावेश असणार आहे ज्यामध्ये अधिकाधिक खाती उघडण्यासाठी जनसा मान्यांसाठी सरकार बँकेचे कवाड खुले करणार आहे.

याव्यतिरिक्त तथापि अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले की ' सरकारने बँकांना निष्क्रिय पंतप्रधान जन धन योजना खाती बंद करण्याचे कोणतेही आदेश जारी केलेले नाहीत.' वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने (DFS) बँकांना निष्क्रिय पंतप्रधान जनधन योजना खाती बंद करण्यास सांगितले आहे अशा माध्यमांमध्ये आलेल्या निव्वळ अफवा असल्याचे सांगत, डीएफएस (DFS) ने स्पष्ट केले आहे की त्यांनी बँकांना निष्क्रिय पंतप्रधान जन धन योजना खाती बंद करण्यास सांगितले नाही. आतापर्यंत, भारतात ५५.४४ कोटींहून अधिक जन धन खाती उघडण्यात आली आहेत, त्या खातेदारांपैकी ५६ टक्के महिला आहेत. या वर्षी २१ मे पर्यंत या खात्यांमधील ठेवी २.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाल्या होत्या.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा