प्रतिनिधी: नेटवर्क १८ मिडिया व इन्व्हेसमेंट लिमिटेड (Network 18) कंपनीचे समभाग आज तब्बल १२.१९% वाढले. सकाळच्या सत्रात भागभांडवल धारकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने आज समभागाने (Shares) मध्ये मोठी उसळी घेतली. कंपनीने नुकत्याच आपल्या तिमाहीचा निकाल जाहीर केला होता. ज्यामध्ये कंपनीच्या ' फंडामेंटल ' मजबूत असल्याचे स्पष्ट झाल्याने ही वाढ होत आहे. कंपनीच्या करपूर्व कमाईत (EBITDA) ६९% वाढ झाल्याने ही कामगिरी शेअरने आज बाजारात केली. कंपनीने काल आपला सविस्तर तिमाही निकाल (Q1FY26) जाहीर केला. त्यातील माहितीनुसार, कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ५१६.१७ कोटींचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. मागील वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला ७४.६५ कोटींचे नुकसान झाले होते. मात्र कंपनीच्या यंदाच्या तिमाहीत मागील वर्षाच्या तिमाहीतील तुलनेत कामकाजातून मिळालेल्या महसूलात (Revenue from Operations) घसरण झाली. मागील वर्षाच्या तिमाहीतील महसूल ४५२.७७ कोटींवरून या तिमाहीत ४३०.४० कोटींवर पोहोचला. कंपनीच्या एकत्रित महसूलात (Consolidated Revenue) मागील वर्षाच्या तिमाहीतील तुलनेत ८५.१% घसरण झाली. मागील वर्षाच्या तिमाहीत कंपनीला एकत्रित महसूल ४६७.८६ कोटींवर गेला आहे जो मागील वर्षाच्या तिमाहीत ३१४०.९२ कोटी होता. मंगळवारी कंपनीच्या शेअ र्समध्ये ०.६८% घसरण झाली असली तरी आज पुन्हा शेअर्सने मोठी उसळी घेतली आहे.
निकालांवर भाष्य करताना, नेटवर्क १८ चे अध्यक्ष आदिल जैनुलभाई म्हणाले, 'तथापि, मजबूत ऑपरेटिंग कामगिरीचा आणखी एक तिमाही, सतत मॅक्रो-इकॉनॉमिक अडचणींमुळे, तो आर्थिक कामगिरीशी सुसंगत झाला नाही. गेल्या काही तिमाहींमध्ये ऑपरेटिंग मेट्रिक्समध्ये आमची स्थिर प्रगती व्यवसायासाठी आमच्या दृष्टिकोनाची आणि आमच्या योजनांच्या धोरणात्मक अंमलबजावणीची साक्ष देते. आमचे नवीन उत्पादन लाँच आमच्या भविष्यकालीन दृष्टिकोनावर आणि आमच्या व्यवसायात विविधता आणण्याच्या आणि वाढीचे नवीन मार्ग तयार करण्याच्या आमच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकते.' नेटवर्क १८ चे एकूण युट्यूब व्ह्यूअरशिप जवळजवळ १९ अब्ज व्ह्यूजपर्यंत वाढली जी गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे.