मीरा-भाईंदर शहरातील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मेट्रो लाईन समवेत असणारे काशिगाव मेट्रो स्थानक ते काशिमिरा नाक्यापर्यंत तसेच मीरागाव ते काशिगाव मेट्रो स्थानकापर्यंतचे वाया आकाराचे पूल मुख्य पुलला जोडण्याच्या कामास गती देण्यात यावी. तसेच मिरा-भाईंदर शहरातील मुख्य रस्ता, काशिमिरा नाका ते रेल्वे फाटक पर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रीटचे करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.



विधानभवन येथे मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र मेहता, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, प्रधान सचिव नगरविकास विभाग डॉ. के. एच. गोविंदराज, एमएमआरडीएचे महानगरआयुक्त डॉ. संजय मुखर्जी, उद्योग विभागाचे सचिव पी. अनबलगन, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल, ऊर्जा विभागाच्या सचिव आभा शुक्ला, मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद अरिबम शर्मा उपस्थित होते.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मीरा रोड परिसरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता या ठिकाणी नवीन शिधावाटप कार्यालय करण्यात येईल तसेच उपनिबंधक कार्यालयाच्या निर्मितीसाठी ३५ पदांच्या निर्मितीचा प्रस्ताव पाठवण्यात यावा. मीरा- भाईंदर महानगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या जागांच्या आरक्षणाची यादी तयार करावी. शाळांकरिता किंवा अन्य कोणत्या प्रयोजनासाठी आरक्षित ठेवलेल्या जागा अन्य कोणत्याही कारणासाठी वापरता येणार नाहीत अशी जागा वापरात येत असेल तर तत्काळ काम थांबवावे, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.


यावेळी भाईंदर- दहिसर लिंक रोड, भाईंदर पूर्व जैसलपार्क- घोडबंदर रस्ता, सूर्या धरणातून मीरा-भाईंदर शहराची पाणीपुरवठा योजनेची कामे, मीरा-भाईंदर शहरात प्रस्तावित क्लस्टरचे आराखडे, धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाकरता सवलती, एसटी महामंडळाची पडीक जागा मीरा-भाईंदर पालिकेच्या परिवहन विभागासाठी देणे आदी प्रश्नांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

Comments
Add Comment

तणाव वाढला, तैवान जवळ पोहोचला चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा

तैपेई : चीन आणि तैवान यांच्यातील तणाव वाढू लागला आहे. चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा तैवान जवळ पोहोचू लागला

ठाणे पोलिसांनी ज्येष्ठांसाठी विकसित केला ‘आधारवड’ मोबाइल अॅप

ठाणे : ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या

सुबोध भावे साकारणार निम करोली बाबा

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता सुबोध भावे आता हिंदी सिनेसृष्टीत एक मोठी झेप घेत आहे. तो लवकरच येणाऱ्या

५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...!

५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...! महाभारत या महाकाव्याच्या संदर्भाने सांगायचे तर, दक्षिणायन व उत्तरायण यात

सोलापूर विभागात पहिली ‘कवच’ चाचणी यशस्वी

मुंबई : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी रविवारी सोलापूर विभागात ‘कवच’ प्रणालीच्या यशस्वी लोको

शेअर बाजारातील प्राथमिक मार्केट...

डॉ. सर्वेश सुहास सोमण आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे खासगीरीत्या आयोजित