Friday, August 15, 2025

Indigo विमानाचे एक इंजिन फेल, दिल्लीवरून गोव्याला जाणाऱ्या विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

Indigo विमानाचे एक इंजिन फेल, दिल्लीवरून गोव्याला जाणाऱ्या विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
मुंबई: दिल्लीवरून गोव्याला जात असलेल्या इंडिगोच्या एका विमानाचे बुधवारी रात्री इंजिन फेल झाल्याने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. सूत्रांच्या माहितीनुसार, फ्लाईटने उड्डाण केल्यानंतर पायलटने रात्री ९.२५ मिनिटांच्या सुमारास एटीसीला इमर्जन्सीची सूचना दिली होती. यानंतर विमान रात्री ९.४२ मिनिटांच्या सुमारास सुरक्षित लँड करण्यात आले. विमानाच्या सुरक्षित लँडिंगनंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीवरून गोव्याला उड्डाण केलेल्या इंडिगो 6E-231मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर इमर्जन्सी लँडिंग करावी लागली.

विमानाचे इंजिन झाले फेल

सूत्रांच्या माहितीनुसार, विमानाचे एक इंजिन मिड एअरमध्ये फेल झाले. यानंतर पायलटने एटीसीला सूचना केली. मुंबईत या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. रात्री ९.२५ वाजता आपात्कालीन अलार्म वाजल्यानंतर विमानतळावर पूर्णपणे प्रोटोकॉल लागू करण्यात आले. फायर टेंडर आणि अॅम्ब्युलन्स स्टँडबायवर ठेवण्यात आले. विमान रात्री ९.४२ वाजता मुंबईच्या विमानतळावर सुरक्षितरित्या उतरले. इंडिगोच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लाईट 6E-231मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईत इमर्जन्सी उतरवण्यात आले. विमानाची तपासणी केली जात आहे. तसेच प्रवाशांना त्यांच्या गंतव्या स्थानावर पोहोचवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा