IndiGo Flight Escapes Crash: पाटणा विमानतळावर इंडिगो विमानाचा अपघात थोडक्यात टळला, नेमके काय झाले होते?

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली


पाटणा: पाटणा विमानतळावर एक मोठा विमान अपघात टळला. दिल्लीहून येणाऱ्या इंडिगोच्या विमानाला धावपट्टीवरून खाली उतरावे लागले. वैमानिकाने आपल्या सतर्कतेने विमान नियंत्रणाबाहेर जाण्यापासून वाचवले. त्याने ताबडतोब गो-अराउंड प्रक्रिया अवलंबली आणि विमान पुन्हा यशस्वीरित्या उतरवले.या विमानात एकूण १७३ प्रवासी होते. या घटनेमुळे पाटणा विमानतळाच्या लहान धावपट्टीवरून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मंगळवारी रात्री ९ वाजता दिल्लीहून येणारे इंडिगो एअरलाइन्सचे विमान ६ई २४८२ लँडिंग दरम्यान धावपट्टीच्या नियुक्त टचडाऊन झोनमधून बाहेर पडले. विमानाच्या मुख्य लँडिंग गियरने धावपट्टीला स्पर्श केला. मात्र विमान निश्चित जागेच्या पलीकडे गेले होते.  पायलटने मूल्यांकन केले तेव्हा त्यांना असे आढळून आले की, इतक्या लहान धावपट्टीवर विमानाचे लँडिंग शक्य नाही. त्यामुळे पायलटने पुन्हा विमान आकाशाकडे झेपवले. काही वेळ चक्कर मारल्यानंतर ते पुन्हा लँडिंग करण्यात आले. यावेळी लँडिंगमध्ये कोणतीही अडचण आली नाही.

लहान धावपट्टीच्या अंतरामुळे होणार होती दूर्घटना


जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्री ९ वाजता लँडिंग होणारे विमान ६ई-२४८२ लँडिंग दरम्यान क्रॅश होता होता राहिले.  पाटणाच्या  धावपट्टीच्या लहान अंतरामुळे विमान सुरक्षित लँडिंग झोन ओलांडल्याचे लक्षात आल्याने सतर्क पायलटने लँडिंग न करण्याचा निर्णय घेतला आणि तपासणी सुरू केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

विमान कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, लँडिंग योग्यरित्या पूर्ण होऊ शकले नाही म्हणून वैमानिकाने मानक सुरक्षा प्रक्रिया पार पाडली. त्याआधी, धावपट्टीजवळ आल्यानंतर काही क्षणांत अचानक पुन्हा हवेत चढल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

वैमानिकाने विमानाला जवळजवळ पाच मिनिटे हवेत ठेवले, दुसऱ्या प्रयत्नात सुरक्षितपणे उतरण्यापूर्वी विमानतळाभोवती चार वेळा प्रदक्षिणा घातल्या. दरम्यान, विमानातील क्रू सदस्यांनी प्रवाशांची भीती कमी केली आणि त्यांना सांगितले की तांत्रिक कारणांमुळे विमान पुन्हा उड्डाण घेण्यात आले आहे आणि लवकरच ते उतरेल.

तज्ञांच्या मते, ‘’जर विमान धावपट्टी संपण्यापूर्वी थांबू शकत नसेल आणि धावपट्टीच्या पलीकडे जात असेल, तसेच जेव्हा विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर आवश्यक ब्रेक लावू शकत नसेल किंवा ते थांबवण्यासाठी थ्रस्ट रिव्हर्सल वापरू शकत नसेल तेव्हा असे घडते.’’

अलायन्स एअरच्या दुर्दैवी अपघाताच्या आठवणी ताज्या


या घटनेने १७ जुलै २००० रोजी झालेल्या अलायन्स एअरच्या दुर्दैवी अपघाताच्या आठवणी ताज्या केल्या, जेव्हा कोलकाताहून दिल्लीला जाणारे विमान तांत्रिक बिघाडामुळे पाटणा विमानतळावर उतरू शकले नाही. विमान गरदानीबाग येथील निवासी निवासी इमारतींवर कोसळले होते, ज्यामध्ये सर्व क्रू मेंबर्स आणि जमिनीवर असलेल्या अनेकांसह ६६ जणांचा मृत्यू झाला होता.

Comments
Add Comment

Udhampur Accident: धमपूरमध्ये टँकरची डंपरला जोरदार धडक लागताच लागली भीषण आग; महामार्गावर थरकाप उडवणारी परिस्थिती

उधमपूर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर परिसरात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री उशिरा तेल टँकर आणि

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला