Wednesday, August 27, 2025

अडीच वर्षात तुम्ही काय केलं? शंभूराजे देसाई यांच्यावर आवाज चढवताच गुलाबराव पाटलांनी ठोकली छाती, विधानसभेत जोरदार राडा

अडीच वर्षात तुम्ही काय केलं? शंभूराजे देसाई यांच्यावर आवाज चढवताच गुलाबराव पाटलांनी ठोकली छाती, विधानसभेत जोरदार राडा

शिंदेंच्या शिलेदाराने आदित्य ठाकरेला सुनावले

मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरु आहे. आज (१५ जुलै) विधासभेत मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंसह (Aditya Thackeray) वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्यात जोरदार राडा झाला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) शंभूराज देसाई यांच्या मदतीला धावून आले.

मुंबईमधील वांद्रे परिसरात ४२ एकर जमीन डिफेन्स लँड संरक्षण विभागाची मालकी असल्याने ९४८३ झोपड्यांचे पुनर्वसन रखडल आहे. ही ललक्षवेधी वरुण सरदेसाई यांनी मांडली. यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी २०१९ ते २०२२ साली एकदा ही याबाबत तत्कालीन सरकारने बैठक घेतली नसल्याचं सांगितलं. यावरुन वरुण सरदेसाई यांच्यासह आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. मंत्र्यांनी जे पत्रकात आहे, तेच सभागृहात सांगितलं. त्यांना चांगलं ब्रिफिंग मिळालं नसेल, असं वरुण सरदेसाई म्हणाले. तुम्हाला उत्तर ऐकायचं नाहीय का?, असं म्हणत शंभूराज देसाई रागाने खाली बसले. यानंतर मंत्री गुलाबराव पाटील देखील शंभूराज देसाईंच्या बाजूने उभे राहिले. छातीवर हात मारत लाज काढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय? तुम्ही जन्मताच शिकले का? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.

शंभूराज देसाई आक्रमक 

तुम्ही २०१९ ते २०२२ पर्यंत काय केले? याबाबत सांगा. एकदाही पत्र दिले नाही. एकदाही पाठपुरावा केला नाही. त्यावेळी सरकार कोणाचे होते? २०२२ साली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ४ वेळा आम्ही पत्र दिली. तुम्ही काय केले? आमची लाज काढू नका. तुम्ही काय केले ते सांगा? असे म्हणत शंभूराज देसाई यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. मी २०१९ ते २०२२ यावेळेत पाठपुरावा झाला नाही, हे मी म्हटलो.⁠ जर मी कोणाचं नाव घेतलं नाही तर मग एवढी नाकाला मिरची लागायचं कारण काय? असा सवालही शंभूराज देसाईंनी उपस्थित केला.

जन्मताच हुशार होऊन आले का? : गुलाबराव पाटील

त्यानंतर गुलाबराव पाटील म्हणाले, याठिकाणी आदरणीय वरून सरदेसाई यांनी प्रश्न विचारल्यानंतर, माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिले, राम कदम यांनी प्रश्न विचारला, आदित्य साहेबानी विचारला आणि हे उत्तर देत होते. उत्तर देत असताना तुमची काय शंका असेल तर प्रश्नाला उत्तर द्यायला मी तयार आहे. एवढी चर्चा चालू आहे, हे काय जन्मताच हुशार होऊन आले का? सरकारला लाज आहे का, हे लोक कोण बोलणारे? तुमच्यापेक्षा जास्त बोलता येत मला... जास्त बोलायचं नाय. असं गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेला सुनावलं.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >