
गेट वे ऑफ इंडिया ते जेएनपीटी, डोमेस्टिक क्रूझ टर्मिनस ते जेएनपीटी
मुंबई (प्रतिनिधी) : देशातील पहिली पर्यावरणपूरक आणि आधुनिक सुविधांनी सजलेली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आत्ता मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्यास सज्ज झाली आहे. येत्या १ ऑगस्ट २०२५ पासून ही ई-वॉटर टॅक्सी गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीटी आणि डोमेस्टिक क्रूझ टर्मिनस ते जेएनपीटी या दोन जलमार्गावर नियमितपणे धावणार आहे. या उपक्रमामुळे एकीकडे समुद्री वाहतुकीला चालना मिळणार असून, दुसरीकडे वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर उपाय म्हणून एक सकारात्मक पाऊल उचलले जात आहे.
यावेळी सुरू होणारी ही सेवा केवळ एका मार्गापुरती मर्यादित न राहता टप्प्याटप्प्याने बेलापूर, खारापुरी व मांडवा पांसारख्या किनारपट्टी शहरांपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई व ठाणे परिसरातील लाखो नागरिकांना जलमागनि प्रवास करण्याचा एक वेगळा, स्वस्त व पर्यावरण स्नेही पर्याय मिळणार आहे. ही वॉटर टॅक्सी परदेशातून आयात न करता माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड यांनी पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केली आहे.
देशातच निर्मिती झालेली ही पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी असून, एमडीएलने ६ वॉटर टॅक्सी तयार केल्या आहेत. पातील पहिली २४ आसनी वातानुकूलित टॅक्सी सध्या इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेस कंपनीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. कंपनीशी व राज्य सरकारशी सर्व कागदोपत्री करार पूर्ण झाला आहे. ही बोट सध्या अंतिम तांत्रिक चाचण्यांच्या टप्प्यात असून, येत्या काही दिवसांत ती समुद्रात उतरणार आहे.
१ ऑगस्ट २०२५ पासून ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरू होत आहे, याचा आनंद आहे. ई वॉटरटॅक्सीसाठी जेएनपीटी येथे धार्जिणं स्टेशन उभारण्याचे कान येत्या आठवड्याभरात सुरू होणार आहे. - सोहेल कझानी, इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेस कंपनी
चार्जिंग स्टेशनची उभारणी अंतिम टप्प्यात
ई-वॉटर टॅक्सीच्या नियमित सेवेकरिता आवश्यक असलेल्या चार्जिंग स्टेशनची उभारणी डोमेस्टिक क्रूझ टर्मिनस, जेएनपीटी जेट्टीवर सुरू आहे. जेएनपीटीमध्ये स्वतंत्र चार्जिंग पॉइंट उभारण्याचे काम येत्या आठवड्याभरात पूर्ण होणार आहे. यामुळे देशांतर्गत पातळीवरच वॉटर टॅक्सीचे सर्व साखळी निर्माण होणार आहे.
वैशिष्ट्ये
लांबी: १३.२७ मीटर
रुंदी: ३.०५ नीटर
प्रवासी क्षमता: २४ प्रवासी
वेग : १४ नॉटिकल माईल्स
बॅटरी क्षमता
: ६४ किलोवेंट (चार तास ऑपरेशन)
सुविधा: वातानुकूलित, आधुनिक संरचना, शांत प्रवासाचा अनुभव
सर्वसामान्यांना परवडणार ई-वॉटर टॅक्सीचा प्रवास
मुंबईत यापूर्वी विविध मार्गावर वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली होती, मात्र त्या सर्व पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या होत्या. त्यामुळे या सेवेचा ऑपरेटिंग खर्च प्रचंड वाढत होता. परिणामी तिकीट दर सामान्य प्रवाशांच्या आवाक्याबाहेर गेले आणि काही काळातच त्या सेवा बंद पडल्या. मात्र, ई-वॉटर टॅक्सी हा पर्याय सुरू झाल्यामुळे इंधन खर्चात लक्षणीय बचत होणार आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या ई-वॉटर टॅक्सींचे देखभाल आणि संचालन खर्च तुलनेने कमी असल्यामुळे प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सेवा उपलब्ध होणार आहे. या नव्या ई-वॉटर टॅक्सीमुळे मुंबईकरांना पर्यावरणपूरक आणि स्वस्त जलमार्ग उपलब्ध होणार असून, शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावरही नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.