Raigad Rain: मुसळधार पावसातही सुट्टीच्या घोषणेस विलंब, विद्यार्थ्यांसह पालकांना मन:स्ताप

सुधागड-पाली : गेले दोन दिवस रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला, असे असतानाही शाळांना सुट्टीच्या घोषणा करताना विलंब झाल्याने विद्यार्थ्यांसह पालांकानाही याचा मन:स्ताप सहन करावा लागला आहे.

रायगड जिल्ह्याला सोमवारपासून पावसाने झोडपले. जिल्हा प्रशासनाने माणगाव, तळा, रोहा, पाली (सुधागड), महाड व पोलादपूर येथे शाळा व महाविद्यालयांना सुट्टीचा आदेश दिला. मात्र हा आदेश येण्यापूर्वीच अनेक विद्यार्थी शाळा व महाविद्यालयांमध्ये पोहोचले होते. त्यामुळे त्यांची प्रचंड गैरसोय झाली. सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळा व महाविद्यालयांना सुट्टीचा आदेश हा उशिरा पोहोचला, परिणामी तोपर्यंत विद्यार्थी शाळा व महाविद्यालयांमध्ये पोहोचले होते. मात्र अशा परिस्थितीत त्यांना मुसळधार पावसात पुन्हा घरी परतावे लागले.

लहान विद्यार्थ्यांच्या पालकांची काळजी वाढली होती. विद्यार्थ्यांना शाळेतून घरी आणण्यासाठी त्यांना वाटेतच मोठ्या पावसाचा सामना देखील करावा लागला. त्यामुळे पालक देखील संतप्त होते. दरम्यान, सुट्टीचा आदेश हा ठराविक तालुक्यांनाच देण्यात आला. मात्र या तालुक्यांना लागून असलेल्या गावांना देखील पावसाचा फटका बसला. मात्र ही गावं त्या सुट्टी दिलेल्या तालुक्यांमध्ये येत नसल्यामुळे तेथील शाळा व महाविद्यालय मात्र चालूच होती.

सुट्टीच्या आदेशामध्ये स्थानिक परिस्थिती पाहून तेथील प्रशासनाने व सक्षम प्राधिकरणाने सुट्टीचा निर्णय घ्यावा असे नमूद केले असले तरी देखील स्थानिक प्रशासन किंवा सक्षम प्राधिकरण सुट्टी देण्यासाठी पुढाकार घेताना दिसले नाही. वास्तविक पाहता हवामानाचा अंदाज हा आधीच प्रशासनाला माहिती असतो. मात्र महाविद्यालय व शाळांना सुट्टीचा आदेश अतिवृष्टी किंवा वादळाच्या दिवशी पाठवला जातो. म्हणजे मुल शाळेत गेल्यानंतर शासन आदेश देतात. अशा परिस्थितीत पालक व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे सुधागड तालुका मनसे अध्यक्ष सुनील साठे यांनी सांगितले.
Comments
Add Comment

एसीएमई सोलारकडून १०० मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पातील पुढील १६ मेगावॅटचा दुसरा टप्पा सुरू

गुरुग्राम: एसीएमई सोलर होल्डिंग्ज लिमिटेडने गुजरातमधील सुरेंदरनगर येथे असलेल्या त्यांच्या १०० मेगावॅट पवन

वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी १० पट जास्त शुल्क

ट्रकपासून बाईकपर्यंत २,५०० वरून थेट २५,००० रुपये नवी दिल्ली : केंद्र सरकारने रस्ते वाहतूक आणि महामार्ग

रशिया भारताला एसयू - ५७ लढाऊ विमाने देणार

मॉस्को : रशियाने भारताला एसयू-५७ स्टेल्थ लढाऊ विमाने पुरवण्यास सहमती दर्शवली आहे. रशियन कंपनी रोस्टेकचे सीईओ

पाणी भरण्याच्या वादातून तोंडावर 'स्प्रे' मारलेल्या व्यक्तीचे निधन

विरार  : पाणी भरण्याच्या क्षुल्लक वादातून एका महिलेने आपल्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मच्छर

गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य

म्हाडाच्या विकासकांना १०० टक्के मालमत्ता कर माफ' मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हबअंतर्गत म्हाडाने

मुंबईतील १२ मेट्रो स्थानकांवर स्मार्ट लॉकर सुरू

मुंबई : भारताच्या सार्वजनिक वाहतूक इकोसिस्टमसाठी निर्बाध डिजिटल पेमेंट्स आणि सेवा सक्षम करणाऱ्या ऑटोपे पेमेंट