Friday, August 15, 2025

भूमी अभिलेख अपिलांसाठी मुंबईत 'लोक अदालत': रखडलेली प्रकरणं मार्गी लागणार!

भूमी अभिलेख अपिलांसाठी मुंबईत 'लोक अदालत': रखडलेली प्रकरणं मार्गी लागणार!

मुंबई : कोकण विभागातील भूमी अभिलेखांच्या प्रलंबित अपिल प्रकरणांना गती देण्यासाठी एक महत्त्वाची 'लोक अदालत' आयोजित करण्यात आली आहे. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या निर्देशानुसार, ही लोक अदालत २१ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, उपसंचालक, भूमी अभिलेख, कोकण विभाग, मुंबई यांच्या कार्यालयात (डी.डी.बिल्डींग, १ ला मजला, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई- ४००००१) पार पडेल.

या लोक अदालतीचा मुख्य उद्देश कोकण विभागातील प्रलंबित अपिल प्रकरणांवर सुसंवादातून न्याय व जलद निर्णय घेणे हा आहे. यामुळे वेळेची आणि संसाधनांची बचत होऊन प्रकरणे तातडीने आणि पारदर्शकपणे निकाली काढण्यास मदत होईल.

संबंधित नागरिक किंवा अपीलकर्त्यांनी आपली सर्व आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सोबत घेऊन उपस्थित राहावे, जेणेकरून त्यांच्या प्रकरणांचा योग्य आणि अंतिम निपटारा करता येईल.

या संदर्भात अधिक माहितीसाठी, उपसंचालक, भूमी अभिलेख, कोकण विभाग, मुंबई यांच्या कार्यालयाशी किंवा व्हॉट्सॲप क्रमांक - ७७१०९६१८३८ वर केवळ व्हॉट्सॲप संदेशाद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा