' गुडरिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार,२४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात सकाळपर्यंत १ रूपये इतक्या किरकोळ वाढ झाल्याने सोन्याचे दर ९९८९ रुपयांवर पोहोचले तर २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १ रूपये वाढ झाल्याने किंमत ९१५६ रूपयांवर पोहोचली. १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १ रूपये वाढल्याने किंमत ७४९२ रुपयांवर पोहोचली आहे.
माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १० रूपये वाढ झाल्याने दर पातळी ९९८९० रुपयांवर पोहोचली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १० रूपयांनी वाढ झाल्याने दर पातळी ९१५६० रूपयांवर पोहोचली. १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १० रूपये वाढ झाल्याने दर पातळी ७४९२० रूपयांवर पोहोचली आहे.
भारतीय सराफा बाजारातील मुंबईसह प्रमुख शहरांत २४ कॅरेट सोन्याचे सरासरी दर ९९८९ रूपये प्रति ग्रॅम, २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर ९१५६, १८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर ७४९२ रुपयांवर आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात (Gold Futures Index) यांमध्ये सकाळपर्यंत ०.१८% वाढ झाली होती. युएस गोल्ड स्पॉट दरात ०.३९% वाढ झाल्याने प्रति डॉलर सोन्याचा दर ३३५६.१२ औंसवर पोहोचला आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) मधील सोन्याच्या निर्देशांकात ०.१४% वाढ झाल्याने एमसीएक्स दर पातळी ९७९११ रूपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे सोन्याचा एक लाखाचा टप्पा पार करण्यासाठी आता काही क्षण अवधी उरला आहे.
आंतरराष्ट्रीय टेरिफ दबावामुळे, वाढत्या अनिश्चितेतील वाढत्या मागणीमुळे, यापूर्वी गुंतवणूकदारांनी केलेल्या नफा बुकिंग पार्श्वभूमीवर सोने सातत्याने वाढत आहे. विशेषतः डॉलरमध्ये रुपयांच्या तुलनेत सातत्याने वाढ होत असल्याने सोन्याला सपोर्ट लेवल प्राप्त झाली होती जी आजही कायम आहे. मात्र सातत्याच्या दबावाने बाजारात सोन्यात चढउतार कायम राहील असा अंदाज आहे.