रायगड-रत्नागिरीत पूरस्थिती: सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली, महाड शहरात पाणी शिरले!

  90

महाड: गेल्या २४ तासांपासून रायगड जिल्हा आणि महाबळेश्वर विभागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातील काळ आणि सावित्री नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. याचा परिणाम म्हणून, महाड शहराच्या सखल भागांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.



नद्यांना पूर, वाहतूक विस्कळीत


गेल्या २४ तासांत महाड तालुक्यात ५८ मिमी तर महाबळेश्वर खोऱ्यात तब्बल १४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सकाळपासून रायगड आणि विन्हेरे परिसरात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे काळ आणि सावित्री नद्यांना पूर आला असून, सकाळी ११ वाजताच शहरातील सुकट गल्ली आणि दस्तुरी नाका ते नातेखिंड दरम्यानच्या रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे.


महाड-म्हाप्रळ मार्गावर असलेल्या रावढळ पुलावरून नागेश्वरी नदीचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. विन्हेरे भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागेश्वरी नदीचे पात्रही तुडुंब भरले असून, मल्लिकार्जुन मंदिरासमोरील पुलावरून पाणी वाहत आहे.



नागरिकांना सतर्कतेचा इशारा, शाळांना सुट्टी


सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने महाड नगर परिषदेने सायरन वाजवून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच, दक्षिण रायगडमधील शाळा-महाविद्यालयांना आज सकाळपासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुराचे पाणी महाडच्या बाजारपेठेत शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

मुंबईत गौरी गणपतीला निरोप

मुंबई : ढोल-ताशांच्या गजरात आणि 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जयघोषात मुंबईतील विविध भागांतील

अमेरिकेत अनेक शहरांमध्ये ट्रम्प यांच्या धोरणांचा जोरदार विरोध

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सध्या त्यांच्या निर्णयांमुळे मोठ्या अडचणीत आले आहेत. त्यांनी

जरांगेंनी उपोषण सोडले, फडणवीस सरकारने ६ मागण्या केल्या मान्य; मराठ्यांचा विजय

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश आले. जरांगे यांनी मंगळवारी पाच दिवसांपासून सुरु

विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे उज्जैनमध्ये अनावरण

उज्जैन : बहुचर्चित विक्रमादित्य वैदिक घड्याळ आणि मोबाइल ॲपचे अनावरण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव

मेट्रो-४ मार्गिकेच्या कामाला गती, गर्डरचे काम पूर्ण

मुंबई : बहुप्रतीक्षित ठाणे मेट्रो प्रकल्पातील सहा स्थानकांसाठी आवश्यक असलेले गार्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले.

आर. प्रज्ञानंद फिडे क्लासिकल बुद्धिबळ क्रमवारीत चौथ्या स्थानी

मुंबई  : सिंकफिल्ड बुद्धिबळ करंडकात दुसरे स्थान मिळवलेल्या भारताच्या आर. प्रज्ञानंद याने फिडे क्लासिकल