आमदार निवासातले कँटिन पुन्हा सुरू, कंत्राटदार तोच राहणार

  52


मुंबई : निकृष्ट अन्न दिल्याप्रकरणी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातील कँटिनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. यानंतर अन्न व औषध प्रशाससाने कारवाई केली होती. कँटिनमधील अन्नाचे नमुने घेतले होते. कँटिनचा परवाना स्थगित केला होता. पण चार दिवसांतच परिस्थिती बदलली आहे. पुन्हा एकदा कँटिन सुरू करण्यात आले आहे.


ज्यावेळी राडा झाला त्यावेळी कँटिन अजंता केटरर्सकडे होते. कँटिनचा कारभार पुन्हा एकदा अजंता केटरर्सनेच सुरू केला आहे. आकाशवाणी आमदार निवासातील कँटिन चार दिवस बंद ठेवल्यानंतर मंगळवार १५ जुलैपासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. केटरर्स न बदलता कँटिन पुन्हा सुरू करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. पण अन्नाचा दर्जा सुधारल्यामुळे कँटिन पुन्हा सुरू केल्याचे अजंता केटरर्सचे म्हणणे आहे.


निकृष्ट अन्न बघून आमदार संजय गायकवाड यांनी नेसत्या वस्त्रानिशी येऊन कँटिनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. टॉवेल आणि बनियनवर येऊन कँटिनच्या कर्मचाऱ्याला मारहाणा केल्याचा संजय गायकवाड यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर कारवाई झाली होती. पण चार दिवसांतच परिस्थिती मूळ पदावर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने घातलेल्या बंधनांचे पालन रण्याचे आश्वान मिळाल्यानंतरच कँटिन पुन्हा अजंता केटरर्सने सुरू केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आमदार निवासातील कँटिनचे कंत्राट परप्रांतियाला कसे मिळते ? असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे.


Comments
Add Comment

मुंबईत दीड लाख नागरिकांना दरवर्षी भटक्या श्वानांचा दंश

निर्बीजीकरण करून माेकाट कुत्र्यांना आश्रयस्थानात हलवण्याची मुंबईकरांची मागणी मुंबई : दिल्लीतील भटक्या

कोस्टल रोड आजपासून २४ तास वाहतुकीसाठी खुला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले लोकार्पण मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई अध

बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे; मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ मुंबई : मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे —  नीलम गोऱ्हे मुंबई : विधानपरिषद

लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुंबई : काही

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस