भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता कॅलिफोर्निया किनाऱ्यावर झाले लँड
कॅलिफोर्निया: १८ दिवसांच्या आयएसएस मुक्कामानंतर भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज १५ जुलै रोजी, भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता, त्यांच्या साथीदारांसह सॅन दिएगोजवळील समुद्रात सुखरूप उतरले. कॅलिफोर्निया किनाऱ्याजवळील पॅसिफिक महासागरात स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूलचे पॅराशूट चारही अंतराळवीरांना घेऊन उतरले आहे.
परतीचा आव्हानात्मक प्रवास
शुभांशु शुक्ला आणि टीमला पुन्हा पृथ्वीवर घेऊन येणारा हा प्रवास देखील शास्त्रज्ञासाठी आव्हानात्मक होता. कारण पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या ड्रॅगन कॅप्सूलला पृथ्वीच्या वातावरणात आणि गुरुत्वाकर्षण क्षेत्रात स्वतःला व्यवस्थापित करणे सर्वात महत्वाचे होते. त्यानुसार ड्रॅगन कॅप्सूलने २७००० किमी/तास वेगाने वातावरणात प्रवेश केला, ज्याचे तापमान अंदाजे १६००° सेल्सिअसपर्यंत पोहोचले. ज्यामुळे काही काळ नियंत्रण कक्षासोबत कॅप्सूलचा संपर्क तुटला. दरम्यान
लँडिंग आणि पुनर्प्राप्ती वातावरणातून बाहेर पडल्यानंतर, ड्रॅगन कॅप्सूलचे लहान आणि मोठे पॅराशूट उघडले गेले, ज्यामुळे अंतराळयानाची गती कमी होण्यासाठी आणि कॅप्सूल समुद्रात सुरक्षितपणे उतरवणे शक्य झाले. कॅप्सूल समुद्रात उतरल्यानंतर तिथे पूर्वीपासूनच तैनात असलेल्या पुनर्प्राप्ती पथकाच्या बोटी आणि हेलिकॉप्टरद्वारे शुभांशू आणि त्याच्या टीमला ताबडतोब वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाण्यात आले.
#WATCH | In a historic moment, Group Captain Shubhanshu Shukla and the Axiom-4 crew aboard Dragon spacecraft splashes down in the Pacific Ocean after an 18-day stay aboard the International Space Station (ISS)
— ANI (@ANI) July 15, 2025
(Video Source: Axiom Space/YouTube) pic.twitter.com/qLAq2tyW5S
लँडिंगनंतर १० दिवसाचा एकांतवासात
शुभांशू आणि अॅक्स-४ टीमला १० दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे, जेणेकरून आरोग्य तपासणी करण्यासाठी आणि अंतराळाच्या परिणामांमधून बरे होण्यासाठी वेळ मिळेल. हे पुनरागमन भारतासाठी अभिमानाचा क्षण असेल.