Saturday, August 16, 2025

आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीवर बलात्कार

आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीवर बलात्कार

पुणे : आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीला डांबून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणात एक महिला किर्तनकारही आरोपी असून तिच्यासह पाच जणांवर बलात्कार, अपहरण आणि धमकी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आळंदीतल्या केळगाव रस्त्यावर असणाऱ्या खासगी वारकरी शिक्षण संस्थेत ही घटना घडलीय. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून सकल मराठा समाजाने या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केलीय.



तरुणी एकटी असल्याचं सांगून ओळखीच्या व्यक्तीने तिला शेतात जाण्याचं कारण सांगत घराबाहेर नेलं. त्यावेळी एका काळ्या रंगाच्या इर्टिगा कारमधून अण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे यांच्यासह अनोळखी चालकानं जबरदस्तीनं अपहरण केलं. आरडाओरडा करताच अॅसिड हल्ल्याची धमकी दिली. तिथून तरुणीला आळंदीतील मुलींसाठीच्या खासगी वारकरी संस्थेत नेलं.


तरुणीच्या अपहरणानंतर तिला अण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे, किर्तनकार सुनिता आंधळे आणि अभिमन्यू आंधळे यांनी डांबून ठेवलं. तिथं अण्णासाहेब आंधळे यानं तिच्यावर शरीरसंबंधासाठी बळजबरी करत अत्याचार केले. या प्रकरणी किर्तनकार महिलेसह कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा