
प्रतिनिधी:गेल्या दोन महिन्यांपासून भारताने आपली आर्थिक घोडदौड सुरूच ठेवत आज नवा इतिहास रचला इतिहास आहे. भारतातील किरकोळ महागाई व घाऊक महागाईत लक्षणीय घट झाली आहे. भारताच्या वाणिज्य मंत्रालयाच्या सांख्यिकी विभागाने (Statistics) आकडेवारी आज जाहीर केली आहे. त्यानुसार भारतातील किरकोळ महागाई निर्देशांकात (Retail Inflation Index) यांमध्ये मे महिन्यातील २.८२% तुलनेत घसरण होत जून महिन्यात निर्देशांक पातळी २.१% पातळीवर पोहोचली आहे. गेल्या सहा वर्षांतील ही सर्वात मोठी महागाईतील घसरण झाली आहे.
तज्ञांनी यापूर्वी किरकोळ महागाई दरात २.५% टक्क्यांपर्यंत घसरण होईल असे सर्वेक्षण केले होते. ते आकडे तोडत स्वस्ताईचा नवा उच्चांक गाठण्यास सरकारला यश आले आहे. विशेषतः अन्नधान्यातील झालेल्या किंमतीतील घसरणीमुळे हे लक्ष्य साधणे भारता ला शक्य झाले आहे. याविषयी सरकारने बोलतांना सांगितले की,' जून २०२५ मध्ये महागाई आणि अन्नधान्याच्या महागाईत लक्षणीय घट झाली आहे. हे प्रामुख्याने भाज्या, डाळी आणि उत्पादने, मांस आणि मासे, धान्य आणि उत्पादने, साखर आणि मिठाई, दूध आणि उत्पादने आणि मसाल्यांच्या अनुकूल बेस इफेक्ट आणि महागाईत घट झाल्यामुळे झाले आहे.' असे सरकारी निवेदनात म्हटले गेले.
सीएफपीआय (Consumer Food Price Index CFPI) निर्देशांकात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) म्हणजेच वर्षाच्या अनुषंगाने १.६% घसरण झाली. शहरी व ग्रामीण क्षेत्रात ०.९२%,१.२२% अनुक्रमे घसरण झाली आहे. विशेषतः अन्न महागाईत मे महिन्यापे क्षा जून महिन्यात २०५ बेसिस पूर्णांकाने घट झाल्याने ही महागाई पातळी २०१९ महिन्यांपासून सर्वाधिक कमी आहे.
घाऊक महागाईत २० महिन्यातील सर्वाधिक घसरण !
महागाई दर घसरण्यात भारताला मोठे यश आले आहे. जून महिन्यात गेल्या २० महिन्यातील सर्वाधिक स्वस्ताई असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या महिन्यातही निर्देशांकात मोठी घसरण होऊन १४ महिन्यातील महागाईत सर्वाधिक घसरण झाली होती. तो विक्रम मोडून भारतात जून महिन्यात १.७२% वर घसरण झाली आहे.
प्रामुख्याने ही घसरण रिझर्व्ह बँकेच्या उदार धोरणामुळे होणे शक्य झाले आहे. प्रामुख्याने रिझर्व्ह बँकेने अनपेक्षितपणे रेपो दरात ०.५०% घसरण केल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली होती. त्यामुळे बाजारातील तरलता (Liquidity) मोठ्या प्रमाणात वाढली. अंतिमतः वाढलेल्या पुरवठ्यामुळे किंमती नियंत्रित राखणे भारताला शक्य झाले.
जून महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक (WPI) ०.१३% वर पोहोचला आहे. मे महिन्यात ०.३९%वर, एप्रिल महिन्यात तो ०.८५% वर , मार्च महिन्यात २.२५% पातळीवर स्थिरावला होता. सांख्यिकीतील माहितीनुसार, जूनमध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधा रित चलनवाढीत घट झाली ती मुख्यत्वे अन्नधान्याच्या किमतीत घट झाल्यामुळे आणि फळे आणि भाज्या, डाळी, तृणधान्ये, मसाले आणि खाद्यतेल यांच्या किमती कमी झाल्यामुळे झाली आहे.