
अमरावती : हिंदू स्मशानभूमीत एकाकी बसलेली तरुणी आणि तिच्या मंत्रोच्चारामुळे रिद्धपूर परिसरात एकच चर्चा सुरू झाली आहे. शेतातून परतणाऱ्या तीन तरुणांनी ही घटना पाहिल्यानंतर गावात माहिती दिली, परंतु ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचेपर्यंत ती तरुणी अंधारात नाहीशी झाली होती.
‘आषाढ कृष्ण’ अर्थात १२ जुलै रोजी रात्री १० च्या सुमारास तिघे तरुण स्मशानभूमीजवळून जात असताना त्यांना प्रवेशद्वारावर एक दिवा जळताना दिसला. या दृश्याने आधीच धास्तावलेल्या तरुणांना एक तरुण स्त्री आगीसमोर बसून मंत्रोच्चार करताना दिसली, ज्यामुळे त्यांची पाचावर धारण बसली. ती नेमके काय बोलत होती, हे त्यांना समजू शकले नाही.

बंगळुरू : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. सलग दोन दिवसांत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीशी संबंधित दोन कलाकारांचे निधन झाले. रविवार १३ जुलै ...
या अनपेक्षित आणि भयावह अनुभवानंतर त्यांनी तातडीने गाव गाठले आणि अनेकांना फोन करून माहिती दिली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच सुमारे २० तरुण स्मशानाकडे निघाले.
तरुणांचा जमाव आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून ती तथाकथित मांत्रिक महिला अंधाराचा फायदा घेऊन पसार झाली. मोबाईल आणि टॉर्चच्या मदतीने एक तासभर तिचा शोध घेण्यात आला, परंतु नदीपात्र, उंचसखल शेतशिवार आणि झुडुपे यामुळे तिचा थांगप लागला नाही.
अखेर शोधमोहीम थांबवून सर्वजण घरी परतले. या संदर्भात जिल्हा परिषदेचे माजी सभापती तात्यासाहेब मेश्राम यांनी सांगितले की, ती तरुणी कदाचित आत्म्याला जागृत करण्यासाठी तांत्रिक साधना करत असावी. तिला कुणीतरी यासाठी सुपारी दिली असावी, अशा चर्चा गावात सुरू आहेत.
तथापि, कुणीही निश्चितपणे काहीही सांगायला तयार नाही. त्यांनी हे सर्व अंधश्रद्धा असल्याचे स्पष्ट केले आणि भीती बाळगण्याचे कोणतेही कारण नसल्याचे म्हटले. ती महिला जर सशक्त असती, तर तिला पळून जाण्याची गरज नव्हती, असेही ते म्हणाले.