Saturday, August 2, 2025

वरुण ऍरॉन आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी

वरुण ऍरॉन आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी

नवी दिल्ली : सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२६ च्या आधी माजी वेगवान गोलंदाज वरुण ऍरॉनची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. सनरायर्झच्या फ्रँचायझीने सांगितले की, ऍरॉन न्यूझीलंडचा माजी गोलंदाज जेम्स फ्रँकलिनची जागा घेईल.


वरुणने २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने त्याच्या कारकिर्दीत नऊ एकदिवसीय आणि तितकेच कसोटी सामने खेळले. त्याने गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.


वरुणने २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि भारतासाठी खेळलेल्या एकूण नऊ कसोटी सामन्यांमध्ये १८ विकेट्स घेतल्या. या दरम्यान त्याची इकॉनॉमी ४.७८ होती. त्याच वेळी कसोटी पदार्पणाच्या फक्त एक महिना आधी त्याला इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. वरुणने नऊ एकदिवसीय सामन्यात ११ विकेट्स घेतल्या.


वरुण आयपीएलमध्येही खेळला होता आणि त्याने ५२ आयपीएल सामन्यांमध्ये एकूण ४४ विकेट्स घेतल्या. वरुणने नोव्हेंबर २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.तर तो नोव्हेंबर २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताकडून शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. वरुणने एप्रिल २०२२ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएलमध्ये आपला शेवटचा सामना खेळला होता.

Comments
Add Comment