Monday, August 4, 2025

एआय तंत्रज्ञानाचा वापर करत ऊस उत्पादन वाढवावे

एआय तंत्रज्ञानाचा वापर करत ऊस उत्पादन वाढवावे

श्रीराम शेटे; कादवा सहकारी साखर कारखान्याचे रोलर पूजन


दिंडोरी :साखर उद्योग मोठ्या अडचणीतून मार्गक्रमण करत असून दरवर्षी गाळप कमी होत हंगाम दिवस कमी होत आहे त्याचा फटका साखर कारखान्यांना बसत
आहे.जास्तीत जास्त गाळप होण्यासाठी सर्वांनी ऊस लागवड करावी तसेच ए आय तंत्रज्ञानाचा वापर करत एकरी उत्पादन वाढवावे असे आवाहन कादवा चे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.


कादवा सहकारी साखर कारखान्याचे रोलर पूजन संचालक रावसाहेब पाटील यांचे हस्ते झाले त्यावेळी श्रीराम शेटे बोलत होते. यावेळी बाजार समिती सभापती प्रशांत कड, संचालक गंगाधर निखाडे, साहेबराव पाटील, रामभाऊ ढगे, अनिल दादा देशमुख,व्हा. चेअरमन शिवाजी बस्ते, बाळकृष्ण जाधव उपस्थित होते.
पुढे शेटे यांनी सांगितले की, कमी दिवसात जास्तीत जास्त गाळप करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी गेट केन चा ऊस आणावाच लागणार आहे तरी संस्था हितासाठी सर्वांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करत उसपुरवठा कादवा कारखान्यालाच करावा असे आवाहन केले.


कार्यक्रमास दिनकरराव जाधव, शहाजीराव सोमवंशी, विश्वनाथ देशमुख, बापुराव पडोळ, सुखदेव जाधव, सुभाषराव शिंदे, अमोल भालेराव, मधुकर गटकळ, सुनिल केदार, राजेंद्र गांगुर्डे, नामदेव घडवजे, रामदास पिंगळ, बाकेराव जाधव, अशोक भालेराव, रंगनाथ बर्डे, सदाशिव खांदवे, अंबादास पाटील कामगार संचालक भगवान जाधव, युनियन सरचिटणीस अजित दवंगे, वसंत कावळे, दत्तू गटकळ,दिलीप शिंदे, गुलाब तात्या जाधव, बबन देशमुख, ललित जाधव, मच्छिन्द्र पवार, रघुनाथ जाधव, दत्तात्रेय जाधव, प्रकाश पिंगळं, , नामदेव घडवजे,रघुनाथ दिघे,बबन देशमुख,संताजी जाधव,भारत खांदवे आदीसह सभासद,ऊस उत्पादक, अधिकारी, कामगार उपस्थित होते. प्रास्तविक कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी केले.

Comments
Add Comment