
सकाळच्या सत्रात सुरूवातीला सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे निर्देशांकात ०.३७,०.१४ अंकाने वाढ झाली आहे तर निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.४१,०.८७ अंकाने वाढ झाली. निर्देशांकात सुरुवातीच्या कलात घसरण झाली असली तरी निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) मात्र जास्त समभागात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ पीएसयु बँक (१.२०%), मिडिया (०.५७%, हेल्थकेअर (०.६२%), मिडस्मॉल हेल्थकेअर (१.०३%), मिडस्मॉल फायनांशियल सर्व्हिसेस (०.७४%) सम भागात वाढ झाली आहे. तर सर्वाधिक घसरण आयटी (०.९२%), फायनांशियल सर्व्हिसेस (०.२०%) समभागात झाली आहे. युरोपियन युनियनवर युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३०% टेरिफ लावल्यानंतर युएस शेअर बाजारात कालपर्यंत मोठी घसरण झाली होती. एकूणच जगभरातील अस्थिरतेचा फटका भारतीय बाजारातील निर्देशांकात बसत आहे. जेन स्ट्रीट व पंप व डंप प्रकरणानंतर काही प्रमाणात मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये काही प्रमाणात घसरण दिसली तरी बँक निफ्टीने पुनरागमन केल्याने बाजारात काहीसे हायसे वातावरण आहे. ट्रम्प यांनी कॅनडावरही ३५% टेरिफ लावल्यानंतर युएस बाजारातही नाराजीचे पडसाद उमटले होते. मेटा प्लॅटफॉर्म समभागातही याचा फटका बसला होता. आयटीतील गुंतवणूकदारांची चिंता या ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे वाढीस लागली आहे. ओटीटी व्यासपीठावरही अमेरिकेच्या न्यायालयाने आक्षेप घेतल्याने त्यातही युएस बाजारात काही प्रमाणात चढउतार होण्याची शक्यता आहे.
काल युएस बाजारात डाऊ जोन्स (०.२८%), युएस टेक १०० (०.३९%), एस अँड पी ५०० (०.४३), नासडाक (०.२२%) बाजारातील समभागात घसरण झाली होती. सोमवारी सकाळच्या सुरुवातीच्या सत्रातही आशियाई बाजारात निकेयी २२५ (०.०१%), तैवान वेटेड (०.७०%), गिफ्ट निफ्टी (०.१९%) बाजारात घसरण दिसली तरी सुरुवातीच्या कलात हेगसेंग (०.११%), कोसपी (०.४९%), शांघाई कंपोझिट (०.४३%), सेट कंपोझिट (०.८३%) समभागात वाढ झाली आहे. आज सकाळच्या सुरुवातीच्या कलात न्यूलँड लॅब्स (८.०६%), होम फर्स्ट फायनान्स (३.९३%), सीएट (३.९१%),झी एंटरटेनमेंट (३.७४%),पीरामल एंटरप्राईज (३.५८%), आनंद राठी वेल्थ (२.६९%), विशाल मेगामार्ट (२.५६%), बीएसई (२.४८%, कॅनरा बँक (२. ३०%), मदर्सन (१.४६%), पंजाब नॅशनल बँक (१.३२%), बँक ऑफ बडोदा (१.३१%), टोरंट फार्मास्युटिकल (१.२५%), हिंदाल्को (१.२१%),अदानी पॉवर (०.७६%), होंडाई मोटर्स (०.६८%), कोल इंडिया (०.६७%), आयसीआयसीआय लोंबार्ड (०.६५%), एसबी आय (०.७०%) समभागात वाढ झाली आहे.
सकाळच्या सुरुवातीच्या कलात सर्वाधिक घसरण मात्र टेक्नो इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग (३.६४%), गार्डनरीच (३.५३%), भारती हेक्साकॉम (२.९१%), कोचीन शिपयार्ड (२.६१%), माझगाव डॉक (१.९३%),बजाज फायनान्स (१.८२%), एनटीपीसी ग्रीन एनर्जी (१. ५६%), पीव्हीआर आयनॉक्स (१.४३%), एचसीएल टेक्नॉलॉजी (१.४२%), झेन टेक्नॉलॉजी (१.४३%), रामकृष्ण फोर्ज (१.३३%), इन्फोसिस (१.०६%), सिमेन्स एनर्जी इंडिया (३.२९%), आयशर मोटर्स (१.२१%), टेक महिंद्रा (०.९४%), विप्रो (०.९३%), गोदरेज कंज्यूमर प्रोडक्ट (०.९१%), नेस्ले इंडिया (०.८३%), टीसीएस (०.५६%), टाटा मोटर्स (०.३०%) समभागात घसरण झाली आहे.
आजच्या सुरुवातीच्या कलावर भाष्य करताना चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडचे डेरिएटिव विश्लेषक हार्दिक मतालिया म्हणाले,'भारतीय बेंचमार्क निर्देशांक आज सपाट (Flat) ते किंचित नकारात्मक पातळीवर उघडण्याची अपेक्षा आहे असे गिफ्ट निफ्टीने सुचवले आहे,जे निफ्टी ५० मध्ये सुमारे ३४ अंकांची किरकोळ घसरण दर्शवते. मागील सत्रात सावध बंद झाल्यानंतर बाजारातील भावना किंचित अनिर्णीत राहिल्या आहेत. निफ्टी ५० ने सुरुवात कमकुवत केली आणि बहुतेक सत्रात एका अरुंद श्रे णीत व्यवहार केला. तथापि, शेवटी अचानक विक्रीमुळे निर्देशांक खाली ओढला गेला, ज्यामुळे मंदीचा कॅन्डलस्टिक तयार झाला जो नकारात्मक भावना दर्शवितो. तांत्रिकदृष्ट्या, २५३७८ च्या वर सतत हालचाल २५५०० च्या वरच्या दिशेने वाढण्याचा मार्ग मोकळा करू शकते. नकारात्मक बाजूने, २५१२० आणि २५००० वर तात्काळ आधार दिसून येतो, जो या पातळींभोवती स्थिरता निर्माण झाल्यास दीर्घ व्यवहारांसाठी संभाव्य प्रवेश बिंदू म्हणून काम करू शकतो.
बँक निफ्टीने सत्र लाल रंगात संपवले, २०१ अंक गमावले आणि एक लांब वरच्या वीकसह (Long Upper Wick) मंदीचा कॅन्डलस्टिक तयार केला, जो उच्च पातळीवर विक्रीचा दबाव दर्शवितो. ५६,६०० च्या खाली निर्णायक ब्रेकडाउनमुळे पुढील घसरणीकडे नेले जाऊ शकते. (५६४२० आणि ५६२३४).तथापि, जर हे समर्थन स्तर कायम राहिले तर उलटसुलट येऊ शकते ज्यामुळे नवीन खरेदीच्या संधी उपलब्ध होतील. वरच्या बाजूला ५६८१७-५७००० झोनमध्ये प्रतिकार आहे, या श्रेणीपेक्षा जास्त ब्रेकआउट झाल्यास ५७,१७५ पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. संस्थात्मक आघाडीवर, ११ जुलै रोजी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) ५,१०४ कोटी किमतीच्या इक्विटीजचे निव्वळ विक्रेते होते, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DII) ३,५५८ कोटी गुंतवणारे निव्वळ खरेदीदार होते.
वाढत्या अस्थिरता आणि मिश्र बाजार संकेतांच्या सध्याच्या वातावरणात, व्यापाऱ्यांना सावधगिरीने "विक्री वाढ" धोरण अवलंबण्याचा सल्ला दिला जातो, विशेषतः लीव्हरेजसह व्यापार करताना. जोखीम प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी रॅलीजवर आंशिक नफा बुक करणे आणि कडक ट्रेलिंग स्टॉप-लॉस वापरणे शिफारसित आहे. निफ्टी २५३७८ पातळीच्या वर टिकून राहिल्यासच नवीन दीर्घ पोझिशन्सचा विचार केला पाहिजे. व्यापक बाजाराचा टोन सावधपणे तेजीत राहिल्यास, प्रमुख तांत्रिक पातळी आणि जागतिक बा जार संकेतांवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे.'
आजच्या सुरुवातीच्या निफ्टीचा कलावर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले,'आठवडाभर चाललेल्या एकत्रीकरणानंतर आणि शुक्रवारी ब्रेक डाउननंतर, निफ्टी ५० घटकांपैकी फक्त २४% त्यांच्या संबंधित १० दिवसांच्या SMA वर बंद झाले. जूनच्या सुरुवातीपासून हा सर्वात कमी आकडा आहे. पॅराबॉलिक SAR ने जूनच्या अखेरीपासून पहिल्यांदाच विक्रीचे संकेत दिले आहेत. आम्ही आमच्या गणनेत २०० दिवसांचा SMA आणला आहे, जो २४१०० वर आहे आणि आता सध्याच्या पातळीपेक्षा ४% पेक्षा जास्त आहे. योगायोगाने, निफ्टी ५० आणि निफ्टी ५०० घटकांपैकी ४६% आता त्यांच्या संबंधित २०० दिवसांच्या SMA (Simple Moving Average SMA) च्या खाली व्यापार करत आहेत. आमच्या आशा आता २४९२० वर आहेत, जो ५० दिवसांच्या SMA च्या जवळ आहे जो उलट होण्याची संधी देईल. पर्यायीरित्या, २५२३० वर थेट वाढ ही इंट्राडे रिव्हर्सलचे संकेत देऊ शकते, ज्याचे लक्ष्य (Target) २५४२० आहे.'
आजच्या सुरुवातीच्या कलावर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले की,'आयटी शेअर्समधील कमकुवतपणामुळे निफ्टीमध्ये कमकुवतपणा दिसून येत आहे. गेल्या शुक्रवारी रोख बाजारात एफआयआय मोठ्या प्रमाणात विक्रेते असल्याने ही कमजोरी कायम राहू शकते. या कमकुवत बाजारातही बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रे चांगली कामगिरी करत आहेत हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. हा ट्रेंड कायम राहू शकतो. पहिल्या तिमाहीच्या निकालांमध्ये अपे क्षित असलेल्या बँकिंग शेअर्ससाठी एनआयएम कॉम्प्रेशन बाजाराने आधीच कमी केले आहे. त्यामुळे बँकिंग शेअर्समधील घसरण खरेदीसाठी संधी देईल. भारतासाठी सुमारे २०% दरासह अमेरिका-भारत व्यापार करार लवकरच होण्याची अपेक्षा बाजाराला आहे. जर असे झाले तर बाजाराला भावनिक चालना मिळेल. या आघाडीवरील कोणतीही निराशा बाजाराला आणखी खाली खेचू शकते.'
यामुळे आजही बाजारातील अस्थिरता राहण्याचे संकेत दिले जात आहेत.