
मोहित सोमण:इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सोमवारची अखेर घसरणीनेच झाली आहे. प्रामुख्याने ही घसरण जेन स्ट्रीट घोटाळ्यातील घडामोडी, युएसने कॅनडाबरोबर युरोपियन युनियनवर लादलेले टेरिफ,बाजारातील घसरलेला विश्वास,जागतिक आयटीतील सुरू असलेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर भारतीय आयटी कंपनीच्या समभागात घसरण, अखेरच्या क्षणाला घसरलेले फायनान्स कंपन्याचे समभाग (Shares) या एकत्रित कारणांचा परिणाम झाल्याने बाजारातील निर्देशांकात घसरण झाली आहे. सेन्सेक्स २४७.०१ अंकाने घसरण झाल्याने निर्देशांक ८२२५३.४६ पातळीवर स्थिरावला. तर निफ्टीत ६७.५५ अंकाने घसरण झाल्याने निर्देशांक पातळी २५०८२.३० वर स्थिरावली आहे.
सेन्सेक्स बँक निर्देशांकात मात्र वाढत्या हालचालीचा फटका बसल्याने अखेरच्या सत्रात निर्देशांक २.१२ अंकाने घसरला असून बँक निफ्टी १०.६५ अंकाने वाढला आहे.सकाळच्या सत्राप्रमाणेच सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६७, ०.५७% वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.७०%, १.०२% वाढ झाली. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) मध्ये बहुसंख्य समभागात वाढीचा कौल दिला गेला आहे. निर्देशांकात जरी घसरण दिसली तरी बाजारातील सपोर्ट पातळी मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये राखली गेल्याने त्याचा फायदा बाजारात झाला.निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ मिडिया (१.३६%),फार्मा (०.८३%), रिअल्टी (१.३९%), मिडस्मॉल हेल्थकेअर (१.९५%), मिडस्मॉल फायनांशियल सर्व्हिसेस (१.०१%) समभागात झाली. सर्वाधिक घसरण मात्र आयटी (०.११%), खाजगी बँका (०.०५%), तेल व गॅस (०.०३%) समभागात झाली.
आज बाजारातील कमोडिटीत परिस्थिती पाहता सोन्याच्या जागतिक निर्देशांकात सकाळप्रमाणेच संध्याकाळपर्यंतही ०.५९% वाढ झाल्याने आज भारतात सोन्याच्या दरातही मोठी वाढ झाली. कच्च्या तेलाच्या (Crude Oil) निर्देशांकात सकाळपर्यंत झालेली घस रण संध्याकाळपर्यंत मात्र वाढीत बदलली. संध्याकाळी कच्च्या तेलाच्या WTI Future निर्देशांकात १.५६% वाढ झाली तर Brent Future निर्देशांकात सकाळी वाढलेली किंमत संध्याकाळपर्यंत कायम राहिली आहे. अखेरच्या सत्रात Brent निर्देशांक १.४५% वाढला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचीही आज १७ पैशांची घसरण झाल्याने त्याचाही फटका आज निर्देशांकात बसला असण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने शुक्रवारपर्यंत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) मोठ्या प्रमाणात आपली गुंतवणूक काढून घेतली आहे त्या शक्यतेची आजही पुनरावृत्ती झाल्याची शक्यता असल्याने बाजारातील भावनाच प्रतिकात्मक राहिल्या होत्या. युएसमधील टेरिफचे संकट, गेले तीन दिवस पुन्हा वाढत असलेला डॉलर, उद्या जाहीर होणारी ग्राहक किंमत निर्देशांक यामुळे रूपयावर आज दबाव कायम होता.
अखेरच्या सत्रात आशिया बाजारात गिफ्ट निफ्टी (०.३०%), निकेयी २२५ (०.२८%), तैवान वेटेड (०.६०%) बाजारात घसरण झाली आहे. सर्वाधिक वाढ सेट कंपोझिट (१.९४%), जकार्ता कंपोझिट (०.७०%), शांघाई कंपोझिट (०.२७%), स्ट्रेट टाईम्स (०.५२%) समभागात घसरण झाली. युरोपियन युनियनवर लादलेल्या अतिरिक्त टेरिफ करामुळे सीएसी (०.३९%), डीएएक्स (०.७४%) बाजारात घसरण झाली. सुरूवातीच्या युएस शेअर बाजारातील कलात आज तिन्ही बाजारात घसरणीकडे कौल राहिला. डाऊ जोन्स (०.३३%), एस अँड पी ५०० (०.३३%), नासडाक (०.२२%) समभागात घसरण झाली आहे. आज एकूणच जगभरातील अस्थिरतेचा फटका जागतिक शेअर बाजारात दिसत आहे. उद्या युएसमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक जाहीर होणार असल्याने भविष्यात युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करील का याची दिशा स्पष्ट करेल. दरम्यान अमेरिकेतील आयटीतील समभागात सुरु असलेल्या घसरणीचा फटका आशियाई बाजारात दिसत आहे.
दिवसभरात सर्वाधिक वाढ न्यूलँड लॅब्स (१८.२७%),ओला इलेक्ट्रिक (१८.२७%),जेपी पॉवर (१५.२३%), आनंद राठी वेल्थ (१४.८५%), वोडाफोन आयडिया (७.५३%), पिरामल एंटरप्राईज (६.२३%), अलेंबिक फार्मास्युटिकल (५.५१%), साई लाईफ (५.२४%), सीएट (४.४७%), झी एंटरटेनमेंट (४.०८%), बजाज होल्डिंग्स (२.८८%), जेएम फायनांशियल (२.८२%), हिंदुस्थान झिंक (२.६९%), स्विगी (२.०६%), एमसीएक्स (२.०%), बँक ऑफ बडोदा (१.४७%), अदानी ग्रीन एनर्जी (३.०८%), इंटर्नल (२.७५%), होंडाई मोटर्स (२.१५%), वरूण बेवरेज (१.९८%), आयसीआयसीआय लाईफ इन्शुरन्स (१.७९%), लोढा डेव्हलपर (१.४०%), अदानी एंटरप्राईजेस (०.८८%) समभागात वाढ झाली.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण गार्डनरिच (४.७३%), बर्जर पेंट (२.७४%), कोचीन शिपयार्ड (२.७२%), जिओ फायनांशियल (२.०६%), रामकृष्ण फोर्ज (१.९६%), झेन टेक्नॉलॉजी (१.८%),विप्रो (१.५७%), इन्फोसिस (१.५४%), पॉवर फायनान्स (१.३३%), ए व्हेन्यू सुपरमार्ट (१.३%), न्यूजेन सॉफ्टवेअर (१.२४%), आयआरसीटीसी (०.४४%), हिताची एनर्जी (०.३८%), बंधन बँक (०.२६%), सिमेन्स एनर्जी इंडिया (३.१७%), एबीबी इंडिया (१.८९%), टेक महिंद्रा (१.६१%), एशियन पेंट (१.५४%), टाटा मोटर्स (१.०७%), रिलायन्स इंडस्ट्रीज (०.७७%), कोटक महिंद्रा बँक (०.७६%), मारूती सुझुकी इंडिया (०.४८%), चोलामंडलम फायनान्स (०.२७%), एक्सिस बँक (०.०९%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले,'भारतीय इकाॅनाॅमी चौथ्या नंबर वर आली आहे.शस्त्र सामग्री मधे आपली ताकद पाकिस्तान युद्धात जगाने बघितली आहे. आज साडेतीन वर्ष अमेरिकेने रशियाला युद्धात गुंतवून ठेवला आहे.रशिया युद्ध सामग्रीमध्ये महाशक्ती आहे पण पहिल्या पाच आर्थिक महाशक्तीमध्ये नाही. पण भारत आहे. मग भारताला आर्थिक त्रास देण्याकरिता टेरिफ वाॅरचा वापर करत आहे. टेरिफची घोषणा केल्यावर त्याची अंमलबजावणीला तीन महिने मुदत आहे व आजही ऑगस्टपर्यंत काही नाही. या सर्वाचा परिणाम आपल्या शेअर बाजारात पहायला मिळतो आहे. जरा मंदी संपून वातावरण साधारण होत न होतं तर पहेलगाम हल्ला मग दोन महिने युद्धात गेले. आता टेरिफ युद्ध सुरू आहे. आपली तीन ट्रिलिय नची इकाॅनाॅमी होणार याचा किती त्रास अमेरीकेला होत आहे हे स्पष्ट होत आहे.पुढील काही काळात भारत जर्मनीला मागे टाकून तीन नंबर वर येणार शिवाय डिफेन्स मधे जर ताकदवान झाला व जगाने त्याला खरेदीसाठी प्राथमिकता दिली तर भारत महाशक्ती होईल याची काळजीयुक्त भीती आता अमेरीकेला वाटत आहे. म्हणून टेरिफ चर्चचे गुराळ महिनोंमहिने सुरू ठेवून अनिश्चितता निर्माण करीत आहे. ब्राझील बरोबर ब्राझील देशाच्या अंतर्गत विषयात नाक खुपसून नाक कापून अवलक्षण करून घेत आहे. या सग ळ्याचा परिणाम आपल्याच बाजारावर होतोय असे नाही पण संपूर्ण जग स्टँड स्टील झालं आहे.
चीनची अर्थव्यवस्था ही निर्यातीवर अवलंबून आहे.त्यांची अवस्था फार चांगली नाही.सगळ्यात महत्वाचं अमेरिकन जनता महागाई किती सहन करू शकते हेही दुर्लक्षित होत आहे.एकंदरीत लवकरात लवकर एसआयपीची महिन्याची २४-२५ हजार कोटी बाजारात येण्यासाठीची परिस्थिती येत आहे सप्टेंबर २४ पासुन ते मार्च २५ पर्यंतची मंदी बाजाराने पाहीली आहे.आता कंसोलीडेशनची फेज सुरू आहे. यामुळेच आपणही टेरिफ वाॅर शांतपणे पाहू शकतो. बाजार २४५०० पर्यंत सेफ झोनमधे आहेच.तोपर्यंत अमेरिकेची वेगवे गळी रूपं ही जगासमोर येत आहेत हेही चागलंच आहे. तोपर्यंत आपण आपला बाजार कंसोलिडेशन मधुन जात अजून भक्कम स्थितीत जात आहे हे नक्की...'
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'आठवड्याची सुरुवात बेंचमार्क निर्देशांकांनी मंदावलेली असताना, सलग चौथ्या सत्रात त्यांची घसरण सुरू राहिली कारण वाढत्या टॅरिफ चिंतांमुळे गुंतवणूकदारांच्या भावना मंदाव ल्या . निफ्टीने सुरुवात सपाट मार्गावर केली परंतु दिवसभर हळूहळू तोटा सहन केला,मध्य सत्रादरम्यान इंट्राडे ट्रॉफ २५००१ वर नोंदवला. व्यापाराच्या शेवटच्या तासात थोड्याशा घसरणीमुळे निर्देशांक काही तोटा कमी करण्यास मदत झाली आणि अखेर ६७. ५५ अंकांनी किंवा ०.२७% ने घसरून २५०८२.३० वर स्थिरावला. क्षेत्रीय आघाडीवर, आयटी क्षेत्राला १.१% घसरणीचा फटका बसला, तर फार्मा, ग्राहकोपयोगी वस्तू, मीडिया, रिअलिटी आणि पीएसयू बँका यासारख्या कंपन्यांनी चांगली कामगिरी केली, प्रत्ये काने ०.५ % ते १% च्या श्रेणीत वाढ नोंदवली. व्यापक बाजारातील हालचाली तुलनेने तेजीत होत्या, निफ्टी मिडकॅप १०० आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० दोन्ही अनुक्रमे ०.७% आणि १.०२% ने वाढून बंद झाले. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील सीपीआय (C PI) चल नवाढीचे प्रिंट पुढील दोन सत्रांमध्ये प्रसिद्ध होण्याची शक्यता असल्याने, प्रमुख समष्टि आर्थिक उत्प्रेरकांच्या (Catalyst) आधी बाजारातील सहभागी प्रतीक्षा आणि पाहण्याच्या स्थितीत आहेत.'
आजच्या बाजारातील निफ्टीतील हालचालीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' निर्देशांकाने २५००० च्या मानसिक पातळीभोवती एक लांब खालच्या सावलीसह एक बेअर कॅन्डल तयार केली. सलग चौथ्या सत्रात तो कमी उच्च आ णि कमी कमी पातळी तयार करत आहे, जो सुधारात्मक घसरण दर्शवितो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की मागील ११ सत्रांच्या वाढीच्या (२४४७३ वरून २५६६९) फक्त ५०% मागे घेण्यासाठी निर्देशांकाला ११ सत्रे लागली आहेत. या उथळ पुलबॅकवरून असे दिसू न येते की एकूण ट्रेंड सकारात्मक आहे. निफ्टीला २४९००-२५१०० दरम्यान मजबूत आधार आहे, जो ५०-दिवसांच्या EMA (Exponential Moving Average EMA) मागील ब्रेकआउट झोन आणि वाढत्या ट्रेंडलाइनशी जुळतो. आम्हाला अपेक्षा आहे की निर्दे शांक हा आधार कायम ठेवेल आणि येत्या सत्रांमध्ये २५५००-२५६०० पर्यंत परत येईल. आम्ही सध्याच्या घसरणीला खरेदीची संधी म्हणून पाहतो. तथापि, जर निफ्टी २४९०० च्या खाली आला तर तो अल्पकालीन अपट्रेंडला तात्पुरते थांबवू शकतो.'
आजच्या बाजारातील बँक निफ्टीतील हालचालीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' बँक निफ्टीने दोन्ही दिशेने लांब सावल्या असलेली डोजी कॅन्डल तयार केली जी स्टॉक विशिष्ट हालचाली दरम्यान एकत्रीकरणाचे संकेत देते. गे ल्या सात सत्रांमध्ये अपेक्षित रेषांवर निर्देशांक ५६४००-५७६०० च्या श्रेणीत एकत्रित होताना दिसत आहे. आम्हाला अपेक्षा आहे की निर्देशांक हाच विस्तार करेल आणि ५६४०० च्या खाली गेल्यास ५६०००-५५००० च्या प्रमुख समर्थन क्षेत्राकडे सुधारात्मक घसरण वा ढेल. प्रमुख अल्पकालीन समर्थन ५६०००- ५५५०० क्षेत्रावर ठेवण्यात आले आहे, जे ५० दिवसांच्या EMA आणि प्रमुख रिट्रेसमेंट पातळीचे संगम दर्शवते. व्यापक कल सकारात्मक राहतो आणि सध्याच्या घसरणीकडे खरेदीच्या संधी म्हणून पाहिले पाहिजे.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले,' देशांतर्गत बाजारपेठेत एकत्रीकरण सुरूच राहिले कारण टॅरिफ मथळे आणि उत्पन्न हंगामाची मंद सुरुवात यामुळे गुंतवणू कदारांना ३ वर्षांच्या उच्च पातळीवर मूल्यांकन व्यापारासह अधिक संवेदनशील राहण्यास भाग पाडले जात आहे. तथापि, आरोग्यसेवा, रिअल्टी, ग्राहक आणि विवेकाधीन क्षेत्रात क्षेत्रनिहाय वाढ होत असताना स्टॉक-विशिष्ट कृती सुरू आहे, तर आर्थिक वर्ष 26 म ध्ये कमाई डाउनग्रेडच्या जोखमीमुळे आयटी मागे आहे.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्व्हेसमेंट इक्विटीचे तंत्रज्ञान व डेरिएटिव विश्लेषक सुंदर केवात म्हटले,'भारतीय शेअर बाजाराने आठवड्याची सुरुवात मंदावलेल्या स्थितीत केली. निफ्टी २५१४९ वर स्थिरावला, काही काळासाठी २५१५१ च्या इंट्राडे उच्चांकाला स्पर्श केला आणि २५००१ च्या नीचांकी पातळीवर घसरला, कारण बाजार दबावाखाली होते. अमेरिकेने १ ऑगस्टपासून युरोपियन युनियन आणि मेक्सिकोमधून होणाऱ्या बहुतेक आयातीवर ३०% कर लादण्याचा आपला इरादा जाही र केल्याने, ही घसरण प्रामुख्याने जागतिक व्यापार तणावामुळे झाली,कारण चालू वाटाघाटी असूनही. तांत्रिकदृष्ट्या, निफ्टी आता २५००० वर एका महत्त्वपूर्ण समर्थन क्षेत्राभोवती फिरत आहे - एक पातळी जी मानसिक आणि तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. या पा तळीखाली निर्णायक उल्लंघनामुळे आणखी घसरण होऊ शकते. क्षेत्रीय आघाडीवर मीडिया, रिअल्टी, आरोग्यसेवा आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सापेक्ष ताकद दाखवली.तर आयटी,वित्तीय सेवा आणि तेल आणि वायू क्षेत्रात कमकुवतपणा दिसू न आला.
डेरिव्हेटिव्ह्जच्या बाबतीत, सीईएससी, पीपीएल फार्मा, एसबीआय कार्ड, पीईएल आणि आरती इंडस्ट्रीज सारख्या शेअर्समध्ये लक्षणीय ओपन इंटरेस्ट बिल्डअप दिसून आले. येत्या साप्ताहिक समाप्तीसाठी, सर्वोच्च कॉल ओपन इंटरेस्ट २५५०० आणि २५३०० स्ट्राइक किमतींवर केंद्रित आहे, तर कमाल पुट ओपन इंटरेस्ट २५००० च्या पातळीवर दिसून येत आहे - जो येथे मजबूत आधार दर्शवितो. निफ्टीसाठी पुट-कॉल रेशो (पीसीआर) सध्या ०.५२ वर आहे, जो ऑप्शन्स सेगमेंटमध्ये मंदीचा पूर्वाग्रह दर्शवितो.'
आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तंत्रज्ञान विश्लेषक रूपक डे म्हणाले,'टॅरिफ तणावामुळे बाजारातील भावनांवर परिणाम होत असल्याने निफ्टीमध्ये घसरण सुरूच आहे. याव्यतिरिक्त, सहभागी भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांकडून सीपीआय डेटाची (Consumer Price Index CPI) वाट पाहत आहेत, ज्यामुळे एकूण भावना आणखी कमकुवत होत आहे. तांत्रिकदृष्ट्या, इंट्राडे आधारावर निर्देशांक २५००० पर्यंत घसरला, जो ५०- डीएमएच्या (Displaced Mo ving Ave rage DMA) अगदी जवळ आहे. खालच्या टोकावर, समर्थन २४९००-२४९५० वर ठेवले आहे. जर हा झोन कायम राहिला तर २५३५० पर्यंत वाढ होण्याची शक्यता दिसते. तथापि,२४९०० च्या वर टिकून राहण्यात अयशस्वी झाल्यास सुधारणांचा एक खोल टप्पा सुरू होऊ शकतो.'
आजच्या सोन्याच्या हालचालीवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले,'जागतिक स्तरावर पुन्हा एकदा कर तणाव निर्माण झाल्याने सोन्याच्या किमतीत सकारात्मक कल दिसून आला.५५० रुपयां ची वाढ हो ऊन ते ९८३५० रुपयांवर पोहोचले. अमेरिकेने युरो कॅनडा मेक्सिको इत्यादी देशांच्या व्यापार भागीदारांवर अतिरिक्त कर लादल्याने, डॉलर निर्देशांकात मोठी घसरण आणि अलिकडच्या काळात रुपया कमकुवत झाल्याने, सोने सुरक्षित ठिकाण बनले आहे. अनिश्चितता वाढत असल्याने, सोन्याची सुरक्षित ठिकाणे म्हणून मागणी वाढत आहे. या आठवड्यातील प्रमुख यूएस सीपीआय डेटावर सहभागींचे बारकाईने लक्ष असेल. तांत्रिकदृष्ट्या, जोपर्यंत सोने ९७५००-९९५०० च्या विस्तृत श्रेणीत व्यवहार करते तोपर्यंत सोने सकारात्मक बाजू बाळगते.'
आजच्या रुपयांच्या मूल्यांकबाबत भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,'डॉलर निर्देशांकात सुधारणा दिसून आल्याने रुपया ०.१८ रुपयांनी घसरून ८५.९५ वर पोहोचला, जो गेल्या आठवड्यात ९६.५० च्या नीचां की पातळीवरून ९८ च्या पातळीवर पोहोचला. याव्यतिरिक्त, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ आणि देशांतर्गत भांडवली बाजारात थोडीशी कमकुवतपणा यामुळे रुपयावर दबाव वाढला. या घटकांमुळे भावनेवर परिणाम होत असल्याने, रुपया बॅकफूटवर राहिला. चलन ८५.४५ ते ८६.२५ च्या श्रेणीत व्यापार करण्याची अपेक्षा आहे.'
आज एकूणच जगभरातील अस्थिरतेचा अंक पुढेही कायम राहण्याची शक्यता असून उद्याच्या युएसमधील टेरिफ घडामोडी व सीपीआय आकडेवारी बाजाराला दिशादर्शक ठरू शकतात.