
a भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने रविवारी आपला जोडीदार पारुपल्ली कश्यपासून वेगळे होण्याची घोषणा केली. सायनाने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून याची माहिती दिली आहे. सायना आणि पारुपल्ली यांचे ७ वर्षांपूर्वी लग्न झाल होते. दोघेही हैदराबाद येथे पुलेला गोपीचंद यांच्या बॅडमिंटन अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत होते. दोघेही दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१८मध्ये त्यांनी लग्न केले होते.
सायना नेहवालने २०१२मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते तर २०१५मध्ये वर्ल्ड बॅडमिंटन रँकिंगमध्ये तिने पहिले स्थान मिळवत इतिहास रचला होता. ती जगातील नंबर वन बनणारी पहिली भारतीय महिला खेळाडू होती. खेळामध्ये ती स्पोर्ट्स आयकॉन होती. तर पारुपल्ली कश्यपने २०१४मध्ये कॉमनवेल्स गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले होते. तसेच वर्ल्ड रँकिंगमध्ये तो सहाव्या स्थानावर पोहोचला होता. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने चांगली कामगिरी करत आपली ओळख बनवली होती.
सायना नेहवालने रविवारी रात्री उशिरा इन्स्टाग्रामवर एक धक्कादायक विधान केले. तिने लिहिले, आयुष्य कधी कधी आपल्याला वेगवेगळ्या दिशेला नेते. खूप विचार विनिमयानंतर कश्यप पारुपल्ली आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आम्ही एकमेकांसाठी शांतता, प्रगती आणि दिलासेचा मार्ग निवडला आहे. मी त्या क्षणांसाठी आभारी आहे आणि पुढील प्रवास चांगला होईल अशी आशा करते. या दरम्यान आमच्या प्रायव्हसीचा आदार राखण्यासाठी धन्यवाद. दरम्यान, कश्यपकडून अद्याप कोणतेही विधान आलेले नाही.