
मॉस्को: प्रत्येक देश आपल्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीनुसार धोरणे ठरवतो, पण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी घेतलेल्या एका आगळ्यावेगळ्या निर्णयामुळे जगभरातून त्यांच्यावर टीका होत आहे. लोकसंख्या वाढीसंदर्भात (Russia Pregnancy Scheme ) हा धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे.
युद्धामुळे घटलेली लोकसंख्या, आता अजब उपाय!
रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे दोन्ही देशांचे केवळ सामरिक आणि आर्थिकच नव्हे, तर सामाजिक नुकसानही झाले आहे. या युद्धात रशियाचे लाखो तरुण सैनिक मारले गेल्याने देशातील लोकसंख्या वाढीचा दर मोठ्या प्रमाणात घसरला आहे. ही घट भरून काढण्यासाठी आणि लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी रशियाने एक विचित्र योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत, शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनी गर्भवती राहिल्यास त्यांना चक्क लाखो रुपयांचे बक्षीस दिले जात आहे.

१२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना लोकसेवा आयोगाकडून पदोन्नती मुंबई: महाराष्ट्रातील महसूल (Revenue) विभागातील १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना लोकसेवा आयोगाकडून पदोन्नती ...
एक लाख रुबलचं बक्षीस, 'त्या' भागांत योजना सुरू!
रशियन सरकारने केलेल्या घोषणेनुसार, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयांत शिकणाऱ्या विद्यार्थिनी गर्भवती राहिल्यास त्यांना एक लाख रुबल (सुमारे एक लाख रुपये) बक्षीस म्हणून दिले जात आहे. थोडक्यात, तेथे विद्यार्थिनींना गर्भवती राहण्यास प्रोत्साहित केले जात आहे. मॉस्को टाइम्स आणि फॉर्च्यून रिपोर्टनुसार, रशियामधील केमेरोवो, कारेलिया, ब्रायन्स्क, ओरयॉल, टॉम्स्क या प्रदेशांत ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेनुसार, एखादी विद्यार्थिनी कमीत कमी २२ आठवड्यांची गर्भवती असेल आणि तिचे नाव शासकीय प्रसूतिगृहात नोंदणीकृत असेल, तर तिला हे बक्षीस मिळेल.
योजनेला विरोध, तरीही ४३% नागरिकांचा पाठिंबा!
रशियात लोकसंख्या वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला असला तरी, तेथील काही नागरिकांनी याला तीव्र विरोध केला आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या अहवालानुसार, रशियातील पब्लिक ओपिनियन रिसर्च सेंटरने केलेल्या सर्वेक्षणानुसार, साधारण ४३ टक्के रशियन नागरिकांनी या योजनेला पाठिंबा दिला आहे, तर ४० टक्के लोकांनी या योजनेचा विरोध केला आहे. किशोरावस्थेत गर्भवती राहण्यास प्रोत्साहित केल्यामुळे नैतिक पातळीवर अनेक समस्या उभ्या राहतील, असे काही नागरिकांचे मत आहे.
पुतीन यांचा हा निर्णय जगभरात चर्चेचा आणि टीकेचा विषय बनला आहे.