Sunday, August 3, 2025

चेन्नई-कोलकात्यापेक्षाही मुंबईत जास्त प्रदूषण

चेन्नई-कोलकात्यापेक्षाही मुंबईत जास्त प्रदूषण
मुंबई (प्रतिनिधी): मुंबईतील वातावरण दिवसेंदिवस अधिकच प्रदूषित होत आहे. 'सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अॅड क्लीन एअर' या नामांकित संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, मुंबई शहरातील हवेतील पीएम२.५ या विषारी कणांचे सरासरी प्रमाण राष्ट्रीय मानकपिक्षा कमी आहे. मुंबईतील सायन आणि देवनार भागातील हवा चेन्नई-कोलकात्यापेक्षाही जास्त प्रदूषित आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

या अहवालातील सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे देवनार, सायन, कांदिवली पूर्व आणि बीकेसी यांसारख्या मुंबईतील विशिष्ट भागांमध्ये प्रदूषणाची पातळी ही प्रमाणापेक्षा जास्त वाढली आहे. ही प्रदूषणाची पातळी चेन्नई, कोलकाता, पहुंचेरी आणि विजयवाडा यांसारख्या इतर किनारपट्टीच्या शहरपिंक्षाही अधिक असल्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबईसारख्या किनारपट्टीवरील शहरात असे उच्च प्रदूषित क्षेत्र असणे हे धोक्याचे संकत आहेत.

देशातील २३९ शहरांतील हवेच्या गुणवत्तेवर आधारित हा सविस्तर अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, मुंबईतील देवनार हे किनारपट्टीवरील सर्वात प्रदूषित ठिकाणांपैकी एक आहे. केवळ देवनारच नाही, तर मुंबईतील इतर काही भागांमध्येही पीएम २.५ ची पातळी ४० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर या राष्ट्रीय मर्यदिपेक्षा अधिक आढळली आहे.

तातडीच्या उपाययोजनांची नितांत गरज


मुंबईसारख्या किनारपट्टीच्या शहरातही अशा उच्च प्रदूषणाची नोंद होत असल्याने, स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजनाची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, वाहनांचे वाढते उत्सर्जन, बांधकाम प्रकल्प आणि कचरा जाळणे ही प्रदूषणाची प्रमुख कारणे मानली जातात. मुंबईतील विशिष्ट भागांमध्ये वाढलेले प्रदूषण लक्षात घेता, महानगरपालिका आणि राज्य प्रशासनाने यावर तातडीने लक्ष देऊन कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, जेणेकरून मुंबईकरांना शुद्ध हवा मिळू शकेल.
Comments
Add Comment