Plane Crash: लंडनमध्ये उड्डाणानंतर विमान कोसळण्याची दुर्घटना

  101

लंडन: ब्रिटनमध्ये एक छोटे विमान कोसळल्याची घटना घडली आहे. लंडन साउथेंड विमानतळावर विमानाने उड्डाण घेताच आग लागल्याने हा अपघात झाला. मेडिकल ट्रान्सपोर्ट जेट बीचक्राफ्ट बी२०० सुपर किंग एअरचा अपघात झाला आहे. रुग्णांना घेऊन जाण्यासाठी तयार केलेले हे विमान नेदरलँड्सला जात होते. अपघातानंतर विमानतळावरून काही काळासाठी उड्डाणे रद्द करण्यात आली होती. पोलिसांनी विमानतळाजवळील गोल्फ क्लब आणि रग्बी क्लब देखील रिकामा केला होता.

अपघातग्रस्त विमान १२ मीटर म्हणजेच ३९ फूट लांब होते. अपघातग्रस्त विमान बीच बी२०० सुपरकिंग एअर होते.जे लंडनच्या साउथेंड विमानतळावरून नेदरलँड्समधील लेलीस्टॅडला उड्डाण करणार होते. प्रत्यक्षदर्शी जॉन जॉन्सन म्हणाले
की, विमान "जमिनीवर समोरासमोर आदळल्यानंतर" त्यांना "मोठा आगीचा गोळा" दिसला. दरम्यान, हे विमान सुमारे १२ हवाई प्रवाशांना घेऊन जाण्यास सक्षम आहे. पणअपघाताच्या वेळी विमानात किती लोक होते हे अद्याप कळू शकलेले नाही.

साउथ एंड वेस्ट आणि लेहचे खासदार डेव्हिड बर्टन-सॅम्पसन यांनी त्यांच्या X अकाऊटवरून  या विमान अपघाताबाबत एक पोस्ट शेअर केली. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, "मला साउथएंड विमानतळावर झालेल्या विमान अपघाताची माहिती आहे. कृपया त्या ठिकाणापासून दूर रहा आणि सर्व आपत्कालीन सेवांना त्यांचे काम करू द्या."

Comments
Add Comment

न्यूयॉर्कमध्ये भारतीयांना घेऊन जात असलेल्या बसला अपघात, पाच ठार

न्यूयॉर्क : अमेरिकेतून एक दुःखद बातमी आली आहे. न्यूयॉर्क राज्य महामार्गावर एका बसचा अपघात झाला. नायगरा

अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांवर धोक्याची टांगती तलवार, नियमांचे उल्लंघन केल्यास रद्द होणार व्हिसा

वॉशिंग्टन: अमेरिकेत स्थायिक झालेले किंवा तिथे व्हिसावर वास्तव्यास असलेल्या ५.५ कोटी परदेशी नागरिकांच्या

दक्षिण अमेरिकेत ८ रिश्टर क्षमतेचा भूकंप

वॉशिंग्टन डीसी : भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी सात वाजून ४६ मिनिटांनी दक्षिण अमेरिकेत ८.० रिश्टर क्षमतेच्या

'श्री गणेश करूया...' म्हणत रशियन राजदूताने सुरू केली अमेिरकेवर टीका

भारत संबंधांवर परिणाम होणार नसल्याची रशियाकडून हमी मॉस्को : रशियाकडून भारताला मिळणाऱ्या कच्च्या तेलाची आयात

गाझा पट्टीत इस्रायलचे सैनिक, गाझा ताब्यात घेणार

गाझा : इस्रायलच्या सैन्य तुकड्या गाझा पट्टीत घुसू लागल्या आहेत. शक्य तितक्या लवकर संपूर्ण गाझा पट्टी ताब्यात

युद्ध संपणार! पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यातील भेट लवकरच, व्हाईट हाऊसमध्ये बैठकीनंतर ट्रम्प यांची घोषणा

वॉशिंग्टन: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी