Ola Electric Q1 Results: ओला इलेक्ट्रिकचा तिमाही निकाल जाहीर ! कंपनीला तिमाहीत ४२८ कोटींचे Consolidated नुकसान तरीही 'या' कारणाने शेअर्स १६.४८% उसळला

  53

प्रतिनिधी: ओला इलेक्ट्रिकने (Ola Electric Limited) कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला पहिल्या तिमाहीत (Q1FY26) एकत्रित (Consolidated) ४२८ कोटींचा तोटा झाला आहे. मागील वर्षी कंपनीला ३४७ कोटींचा निव्वळ तोटा झाला होता ज्यामध्ये आणखी भर पडली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ओला इलेक्ट्रिकला कामकाजातून मिळालेल्या महसूलात (Revenue from Operations) यामध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (वार्षिक YoY)४९.६% घसरण झाली आहे. मागील वर्षी च्या तिमाहीत कंपनीला १६४४ कोटींचा कामकाजातून महसूल मिळाला होता तो यंदाच्या तिमाहीत घसरण ८२८ कोटीवर पोहोचला. यामागील तिमाहीतील ८२८ कोटींच्या नुकसानीपेक्षा या तिमाहीतील नुकसान नियंत्रित ठेवण्यास कंपनी यशस्वी झाली. मागील व र्षाच्या तिमाहीतील १८३९ कोटींच्या नुकसानीतील तुलनेत मागील तिमाहीत कंपनीला १०६५ रुपयांचे नुकसान झाले होते ज्यामुळे कंपनीने आपले नुकसान नियंत्रित केले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने यावर्षी मार्च तिमाहीत ६११ कोटींचा महसूल कमावला होता. कंपनीच्या स्थूल मार्जिन इयर ऑन इयर बेसिसवर २९.४% घसरण झाली. ज्यामुळे मार्जिन घसरत मागील तिमाहीतील ३०३ कोटींच्या तुलनेत २१४ कोटींवर राहिले आहे. कंपनीच्या करपूर्व कमाईत (Earning before interest tax depreciation and amortization EBITDA) यामध्ये मागील वर्षाच्या तिमाहीतील २०५ कोटींवरून आणखी घसरत मागील तिमाहीत २०५ कोटीवर घसरण झाली.

ईव्ही (Electric Vechile EV) वाहनातील वाढलेल्या स्पर्धेमुळे कंपनीच्या वाहन विक्रीत (Sales) यामध्ये पण घसरण झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गाड्यांची विक्री मागील वर्षाच्या तिमाहीतील १२५१९८ कोटींच्या तुलनेत घसरत मागील तिमाहीत  ६८१९२ कोटींवर पोहोचली आहे.दरम्यान,' नफा वाढत असताना, आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे रोख प्रवाह (Cash Flow),आमचा ऑटो व्यवसाय पहिल्या तिमाहीत ऑपरेटिंग कॅश फ्लोच्या बाबतीत जवळजवळ तटस्थ होता, ऑटो सेगमेंटसाठी फ्री कॅश फ्लो (Free cash flow FC F) मध्ये लक्षणीय सुधारणा होऊन -१०७ कोटी रुपये आणि एकत्रित आधारावर -२८२ कोटी रुपये झाला' असे कंपनीने तिच्या शेअरहोल्डरला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

दुसरीकडे आपल्या निवेदनात कंपनीने असेही म्हटले की,'नफा वाढत असताना,आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे रोख प्रवाह (Cash Flow) आमचा ऑटो व्यवसाय पहिल्या तिमाहीत ऑपरेटिंग कॅश फ्लोच्या बाबतीत जवळजवळ तटस्थ होता, ऑटो सेगमेंट साठी फ्री कॅश फ्लो (FCF) मध्ये लक्षणीय सुधारणा होऊन -१०७ (तोटा) कोटी रुपये आणि एकत्रित आधारावर -२८२ (तोटा) कोटी रुपये झाला," कंपनीने ऑटोमोटिव्ह सेगमेंटने ८२६ कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवले, जे मागील वर्षीच्या याच तिमाहीत १,६४४ कोटी रुपयांचे होते, जे लक्षणीय घट दर्शवते. विक्री सेगमेंटने ३ कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवले, जे गेल्या वर्षी नोंदवलेल्या ४ कोटी रुपयांपेक्षा किंचित कमी आहे. याविषयी कंपनी म्हणाली,'नफा सुधारत असताना आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे रोख प्रवाह (आमचा ऑटो व्यवसाय पहिल्या तिमाहीत ऑपरेटिंग कॅश फ्लोच्या बाबतीत जवळजवळ तटस्थ होता, ऑटो सेगमेंटसाठी फ्री कॅश फ्लो (FCF) मध्ये लक्षणीय सुधारणा होऊन -१०७ कोटी रुपये आणि एकत्रित आधारावर -२८२ कोटी रुपये झाला'.

तरीदेखील ओला कंपनीच्या शेअर्समध्ये १६.२१% वाढ !

कंपनीच्या कामाकाजातून मिळणाऱ्या महसूलात घट झाली अथवा मागील तिमाहीत नुकसान झाले असले तरी कंपनीच्या शेअर्समध्ये आज भली मोठी वाढ झाली आहे. सकाळी निकालानंतरच समभागात १८% वाढ झाली होती. आज दुपारी एक वाजेपर्यंत कंपनी च्या समभागात १६.४८% वाढ झाली आहे. बाजारातील माहितीनुसार, कंपनीच्या सध्याच्या शेअर्सच्या तेजीचे एक मुख्य कारण म्हणजे ऑटो सेगमेंटमधील नफा वाढणे. या सेगमेंटच्या करपूर्व कमाईत (EBITDA) मध्ये मोठी सुधारणा दिसून आली. मागील वर्षाच्या (Q4FY25) तिमाहीत मध्ये तो नकारात्मक ९०.६% होता, जो मागील तिमाहीत (Q1FY26) मध्ये नकारात्मक ११.६% झाला.
Comments
Add Comment

Stock Market: ट्रम्प यांची धमकी शेअर बाजारावर भारी! 'हे' आहे सत्र सुरूवातीचे विश्लेषण

मोहित सोमण: पहाटेचे आश्वासक चित्र असूनही सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे.

Devendra Fadanvis : फडणवीसांचा निशिकांत दुबेनां थेट सल्ला, “आम्ही सक्षम आहोत, वक्तव्यांपूर्वी विचार करा!”

मुंबई : मराठी विरुद्ध हिंदी या वादावर पुन्हा एकदा पेटलेलं राजकारण आता चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. भाजपचे

उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम