Saturday, August 16, 2025

समुद्रकिनारी तेलाचे तवंग; परिसरात जाण्यास मनाई

समुद्रकिनारी तेलाचे तवंग; परिसरात जाण्यास मनाई

मुरुड : गेल्या दोन दिवसांपासून काशिद बीच समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर तेलाचे तवंग आल्याचे दिसून येत आहे, पावसाळ्यात येथील समुद्र किनारा पर्यटनात बंद असून पावसाळ्यामुळे समुद्र पोहण्यासाठी धोकादायक असून समुद्र किनारी परिसरात जाण्यास व समुद्रात पोहण्यास सक्त मनाई असल्याचे फलक ग्रामपंचायतीतर्फे लावण्यात आले आहेत.


उधाणाच्या भरतीने समुद्रकिनाऱ्यावर गेल्या दोन दिवसांपासून तेल (ऑइल)वाहून आले असून ऑईलचे धब्बे किनाऱ्यावर दूर पसरलेले दिसून येत आहेत. समुद्रकिनाऱ्यावर एक प्रकारची काळी झालर आणि तेलाचा वास सुटलेला आहे. किनाऱ्यावर ऑईलचे गोळे पसरून किनारा विद्रुप झाला आहे. समुद्र पोटात काहीच ठेवत नाही. समुद्राला भरती आली की हेच ऑइलजवळील समुद्रकिनारी गोळ्यांच्या रूपाने किनाऱ्यावर पसरून किनारा विद्रुप झाला असल्याचे दिसून येते आहे.पावसाळ्यात दोन महिने येथील विविध स्टॉल बंद ठेवण्यात आले आहेत. पावसाळ्यात पोहोण्यापासून धोका लक्षात घेऊन याठिकाणी पोलीस, सुरक्षा रक्षक तैनात असून, संरक्षक जाळ्या बसविल्या आहेत.पावसाळ्यामुळे समुद्र पोहण्यासाठी धोकादायक असून समुद्र किनारी परिसरात जाण्यास व समुद्रात पोहण्यास सक्त मनाई असल्याचे फलक ग्रामपंचायतीतर्फे लावण्यात आले आहेत.

Comments
Add Comment