मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभेत आज (सोमवार, ११ जुलै २०२५) एक वेगळाच राजकीय 'ड्रामा' पाहायला मिळाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात 'चड्डी-बनियान गँग' असा उल्लेख करताच, भाजप आमदार निलेश राणे अक्षरशः संतापले आणि त्यांनी आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले.
"नेमकी त्यांची चड्डी कोण, आणि बनियान कोण?"
आदित्य ठाकरेंनी वापरलेल्या या शब्दांवरून निलेश राणे चांगलेच चवताळले. ते म्हणाले, "त्या आदित्यने हे जे काही शब्द वापरले, नेमकं कोणावर कारवाई व्हावी, नेमकं त्यांची चड्डी कोण आणि त्यांची बनियान कोण? हे एकदा त्यांनी सांगावं ना!"
अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आता फडणवीसांचे लक्ष! स्वबळावर लढणार की काय? अमृता फडणवीस नेमक्या काय म्हणाल्या?
पुणे: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी महायुतीत रस्सीखेच वाढताना दिसत आहे. शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गट या ...
'हिम्मत असेल तर स्पष्ट करा'
राणे पुढे म्हणाले, "जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका, वापरायचे नाहीत असे शब्द. कोणासाठी वापरताय हे शब्द? कोणासाठी शब्द होते हे? हिम्मत असेल तर त्यांनी बोलून दाखवावं हे शब्द कोणासाठी होते? उगाच टीका करायची म्हणून काहीही करायची का?"
"एक तासापासून आम्ही ऐकत आहोत, काही बोललो नाही. हे शब्द कुठले? रुलिंगमधून शब्द हे काढून टाकावे या तर त्यांनी स्पष्ट करावं. हिम्मत असेल तर नेमकं कोणाबद्दल बोलले ते स्पष्ट करावं," असे आव्हानही निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना दिले.
आदित्य ठाकरेंनी नेमका कोणाकडे उद्देशून हा शब्दप्रयोग केला होता, हे स्पष्ट झाले नसले तरी, त्यांच्या या विधानावरून विधानसभेत जोरदार खडाजंगी झाल्याचे चित्र होते.