Nimisha Priya: केरळची नर्स निमिषा प्रियाला वाचवणं सरकारला अशक्य! ब्लड मनी नाकारली

सना: येमेनी नागरिकाच्या हत्येप्रकरणी दोषी सिद्ध झालेली केरळची नर्स निमिषा प्रियाला येमेनमध्ये १६ जुलै रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे तिला वाचवण्यासाठी तिचे कुटुंब आणि भारताकडून केले जाणारे प्रयत्न आता संपुष्टात आले आहेत. कारण, निमिषाला वाचवण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून 'ब्लड मनी' ची आशा देखील आता धूसर झाली असल्या कारणामुळे, या प्रकरणात सरकारला फार काही करता येणार नसल्याचे भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलं आहे.



येमेनमध्ये दिली जाणार फाशी


निमिषाला १६ जुलै रोजी येमेनमध्ये फाशी दिली जाण्याची शक्यता आहे. तलाल अब्दो महदी नावाच्या येमेनी नागरिकाच्या हत्येप्रकरणी तिला दोषी ठरवण्यात आलं आहे.



सरकार फार काही करू शकत नाही!


अटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी कोर्टात सांगितलं की, भारत या प्रकरणात जितकं पुढे जाऊ शकत होतं, तितकं गेलं आहे आणि सरकार आपल्या मर्यादेपर्यंत पोहोचलं आहे. सरकार आता फार काही करू शकत नाही. येमेनच्या संवेदनशीलतेला पाहता, हे प्रकरण राजनैतिक दृष्ट्या हाताळणे योग्य नाही. ब्लड मनी हा एक खासगी करार आहे."



काय आहे ब्लड मनी?


ब्लड मनी या व्यवस्थेनुसार, दोषीच्या वतीने पीडित कुटुंबाला एक ठराविक रक्कम दिली जाते. विशेषतः अनवधानाने झालेल्या हत्येच्या प्रकरणात असं घडतं. यानंतर पीडित कुटुंबावर अवलंबून असतं की, ते दोषीला माफ करतात की नाही.


इस्लामिक कायद्यानुसार, गुन्ह्याच्या पीडितांना गुन्हेगारांना कशी शिक्षा द्यावी, याबद्दल आपलं मत देण्याचा अधिकार असतो. हत्येच्या प्रकरणात हे पीडित कुटुंबाला लागू होतं. हत्येच्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावता येते, पण जर पीडित कुटुंबाची इच्छा असेल, तर एका ठराविक रकमेच्या बदल्यात दोषीला माफी देण्याचा पर्यायही निवडता येतो. याला दिया प्रथा असंही म्हणतात. ही रक्कम किती असावी, हे दोन्ही पक्ष मिळून ठरवतात. पण निमिषाच्या प्रकरणात तलालच्य कुटुंबाने ब्लड मनी नाकारली असल्याकारणामुळे तिच्या सुटकेच्या आशादेखील यासोबत संपुष्टात आल्या आहेत.

Comments
Add Comment

'ऑपरेशन सिंदूर'ने अझर मसूदच्या कुटुंबालाच संपवले; तुकडे तुकडे केले!

नवी दिल्ली: भारताच्या धडक कारवाईने दहशतवाद्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. आपल्या देशाच्या सुरक्षेला

अमेरिका-व्हेनेझुएला यांच्यातील तणाव वाढला, अमेरिकेचा ड्रग्ज जहाजावर मोठा हल्ला

वॉशिंग्टन: अमेरिकेने व्हेनेझुएलाहून अमेरिकेकडे येत असलेल्या एका संशयित ड्रग्ज जहाजावर पुन्हा एकदा लष्करी

नेपाळमध्ये सुशीला सरकारचा मोठा निर्णय, आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या Gen-Z ला मिळणार शहीदांचा दर्जा

काठमांडू: नेपाळमध्ये सुशीला कार्की सरकार स्थापन झाल्यानंतर देश हळूहळू आता स्थिरस्थावर होत आहे. सोमवारी सुशीला

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादणार

नाटोला चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लादण्याची मागणी वॉशिंग्टन डीसी (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

सुशीला कार्की नेपाळच्या नव्या हंगामी पंतप्रधान

नेपाळची संसद बरखास्त, हंगामी सरकारचे नेतृत्व करणार नवी दिल्ली : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या