
लंडन : इटलीच्या जानिक सिनरने स्पेनच्या कार्लोस अल्कारेझला पराभूत करत प्रथमच विम्बल्डनचा चषक उंचावला. अंतिम सामन्यात सिनरने कार्लोसवर ४-६, ६-४, ६-४, ६-४ अशा सेटने मात करत आपल्या टेनिस कारकिर्दीतील पाचवे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले.
पहिला सेट गमावल्यानंतरही त्याने जोरदार पुनरागमन करत विम्बल्डनचे अजिंक्यपद मिळवले. फ्रेंच ओपनमध्ये अल्कारेझकडूनच सिनरला पराभव पत्करावा लागला होता. फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात दोन सेटची आघाडी आणि तीन चॅम्पियनशिप पॉइंट्स मिळवूनही अल्कारेझने त्याच्या हातातून विजेतेपद हिसकावून घेतले होते.

लंडन : पोलंडच्या इगा स्वाएटेक या २४ वर्षीय खेळाडूने महिला एकेरी या प्रकारात विम्बल्डन २०२५ ही टेनिस स्पर्धा जिंकली. पोलंडच्या महिला खेळाडूने ...
आता विम्बल्डनच्या विजयाने सिनरने त्या पराभवाचा बदला घेतला आहे. उपांत्य फेरीत यानिक सिनरने सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचे आव्हान परतवून लावत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला होता.
अंतिम फेरीत त्याच्यासमोर कट्टर प्रतिस्पर्धी आणि सलग दोनवेळा विम्बल्डन जिंकणाऱ्या अल्कारेझचे आव्हान होते, परंतु त्याने अत्यंत संयमी खेळ करत अखेर विम्बल्डनचा चषक आपल्या नावावर केला.