लंडन: लॉर्ड्सच्या मैदानावर रंगलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात इंग्लंडने २२ धावांनी विजय मिळवला आहे. सोबतच त्यांनी या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.
भारतासमोर विजयासाठी १९३ धावांचे आव्हान होते. मात्र गिलच्या नेतृत्वातील टीम इंडिया १७० धावांवर ऑलआऊट झाली. भारताने हा सामना २२ धावांनी गमाला. पाचव्या आणि शेवटच्या दिवशी टीम इंडियाला १३५ धावा हव्या होत्या. मात्र ६ विकेट हातात असतानाही टीम इंडियाला या धावा करता आल्या नाही आणि त्यांच्या पदरी निराशा पडली.
पंत, राहुल आणि रेड्डीसारखे अनेक फलंदाज इंग्रजांच्या समोर टिकू शकले नाहीत. दोन्ही संघादरम्यानचा आता चौथा सामना मँचेस्टरमध्ये होणार आहे.
असा होता भारताचा दुसरा डाव
आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात भारतीय संघाची सुरूवात खराब राहिली. त्यांनी यशस्वी जायसवालची विकेट दुसऱ्याच षटकात गमावली. त्यानंतर भारतीय संघाने चौथ्या दिवशीच करूण नायर, कर्णधार शुभमन गिल आणि नाईट वॉचमन आकाश दीप यांनी स्वस्तात विकेट गमावल्या. पाचव्या दिवशीही भारत खराब लयीमध्ये दिसला. कोणताही फलंदाज जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही.
इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ३८७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघही ३८७ धावांवरट आटोपला. म्हणजेच पहिल्या डावात दोन्ही संघ बरोबरीत होते. आता लॉर्ड्स कसोटीत भारताला विजयासाठी १९३ धावा करायच्या आहेत. तिसऱ्या दिवसाच्या खेळात इंग्लंडचा केवळ एक षटक खेळता आले. या षटकांत भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि इंग्लंडचा सलामी फलंदाज जॅक क्राऊली यांच्यात वादावादी झाली.
भारताच्या पहिल्या डावात केएल राहुलचे शतक
भारतीय संघाच्या पहिल्या डावात सलामीवीर केएल राहुलने शतक ठोकले. राहुलने १७७ बॉलमध्ये १०० धावा केल्या. यात १३ चौकारांचा समावेश आहे. राहुलचे कसोटी करिअरमधील हे दहावे शतक आहे. विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने ७४ धावा आणि रवींद्र जडेजाने ७२ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून क्रिस वोक्सने सर्वाधिक ३ विकेट मिळवल्या. तर जोफ्रा आर्चर आणि कर्णधार बेन स्टोक्सने प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या.