Thursday, August 28, 2025

Nasik Crime: नाशकात मुंबईत विक्रीसाठी जाणारा शेकडो टन गांजा जप्त, तिघांना अटक, एक फरार

Nasik Crime: नाशकात मुंबईत विक्रीसाठी जाणारा शेकडो टन गांजा जप्त, तिघांना अटक, एक फरार

नाशिक: समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणारा शेकडो किलो गांजा नाशिक ग्रामीण पोलिसांनी पकडला असून या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर अंधाराचा फायदा घेऊन एक जण पळून गेल्याची घटना घडली आहे विशेष म्हणजे यातील पळून गेलेला आरोपी हा नाशिक शहरातील टिप्पर गॅगचा सराईत गुंड आहे असे माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मागील काही दिवसापासून सतत त्याने होणाऱ्या अमरी पदार्थांच्या प्रवासामुळे पोलिसांनी अमली पदार्थ तस्करी वरती लक्ष केंद्रित केलेले आहे त्यामुळेच नाशिक जिल्ह्यातून अमली पदार्थांची वाहतूक थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ती पावले उचलली जात आहे. अशीच माहिती नाशिकच्या ग्रामीण पोलिसांना मिळाली होती त्यानंतर त्यांनी समृद्धी महामार्गावर ती सापळा रचला आणि त्यामध्ये ओरिसा या राज्यातून मुंबईच्या दिशेने जाणारा १२१ किलो ४२९ ग्रॅम वजनाचा गांजा हा पोलिसांनी पकडला आहे.

कारवाईबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या चार पथकांनी सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या समृद्धी महामार्ग येथे मिळालेल्या माहितीनुसार केली आहे त्यामध्ये अहिल्यानगर येथील भारत नारायण चव्हाण तुषार रमेश काळे संदीप कचरू भालेराव या तिघांना अटक केली आहे तर टिप्पर गॅगचा गुन्हेगार असलेला आणि नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हा केलेल्या आरोपी सुनील भास्कर अनार्थे हा फरार आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी वर्णन मिळालेली पांढऱ्या रंगाची अमेझ कार मुंबईच्या दिशेने जात होती तर मारुती स्विफ्ट कार ही पोलिसांना पाहून पुन्हा नागपूरच्या दिशेने वळविण्यात आली त्यानंतर पाठलाग करून पोलिसांनी मारुती स्विफ्ट कार ही जप्त केली आहे. तर अमेजकार ही शिवडे या ठिकाणी फरार आरोपी सुनील अनार्थे यांनी अंधाराचा फायदा घेत त्या ठिकाणी सोडून दिली आणि तिथून फरार झाला. यावेळी त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले असता दोन पोलीस कर्मचारी हे जखमी झाल्याचे देखील पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले एकूण या मालाची किंमत ही ३६ लाख २९ हजार ५८० रुपये असून यातील एक गाडी ही भाडेतत्त्वावरती घेण्यात आलेली होती तर दुसरी गाडी ही चोरीची असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही सर्व कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके यांच्यासह सहकारी पथकाने केली. हा सर्व गांजा हा मुंबईमध्ये जात असल्याचे प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीवरून समोर आले आहे या ठिकाणी मुंबई बरोबर ठाणे मीरा-भाईंदर या परिसरामध्ये या गांजाची विक्री होणार होती.

Comments
Add Comment