
याशिवाय संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १७० रूपयांची वाढ झाल्याने सोन्याचे दर ९९८८० रूपयांवर गेली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १५० रूपयांनी वाढ झाल्याने दर पातळी ९१५५० रूपयांवर पोहो चली. १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १२० रूपयांनी वाढ झाल्याने दर पातळी ७४९१० रूपयांवर पोहोचली आहे. आज आंतरराष्ट्रीय सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांक (Gold Futures Index) यामध्ये सकाळी ०.२६% वाढ झाली आहे. युएस गोल्ड स्पॉट दरात ०.१०% वाढ झाल्याने स्पॉट दर ०.११% वाढ झाल्याने प्रति डॉलर सोन्याची किंमत ०.२१% वाढत ३३६२ औंसवर गेली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) निर्देशांकात ०.३४% वाढ झाल्याने एमसीए क्समध्ये सोन्याची दर पातळी ९८१५४ रूपयांवर गेली आहे. भारतातील मुंबई पुण्यासह सर्व प्रमुख शहरात २४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर ९९८८ रूपये,२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम किंमत ९१५५ रूपयांवर, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दर पातळी ७४९१ रू पयांवर पोहोचला आहे.
उद्या युएसमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (Consumer Price Index CPI) जाहीर होणार आहे. याआधारावर सोन्याची पुढील पातळी निश्चित होऊ शकते. जागतिक वातावरणातील सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून सोन्याचे महत्व वाढल्याने किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. अमेरिकेतील तज्ञांच्या मते उद्या जाहीर होणाऱ्या सीपीआयमध्ये ०.२३% घट होऊ शकते व कोर किंमत ०.३०% कमी होऊ शकते. तसे झाल्यास फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची शक्यता प्रबळ होऊ शकते जेणेकरून आगामी काळाती ल सोन्यावरील दबाव कमी होऊ शकतो.