
नवी दिल्ली: हरियाणवी गायक राहुल फाजिलपुरियावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. गुरुग्राममधील एसपीआर रोडवर अज्ञात हल्लेखोरांनकडून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. सुदैवाने राहुल यातून बचावला असून, पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे.
हरियाणवी गायक राहुल फाजिलपुरियावर गोळीबार
हरयाणवी आणि बॉलिवूड गायक राहुल फाजिलपुरियावर गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राममधील एसपीआर रोडवर अज्ञात हल्लेखोरांनी ही घटना घडवून आणली आहे.
राहुल हा एक सुप्रसिद्ध गायक आणि रॅपरही आहे. त्याने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. 'कपूर अँड सन्स' चित्रपटातील 'लडकी ब्युटीफुल' हे गाणे त्याचे चांगलेच गाजले. याशिवाय त्यांनी 'लाला लोरी', 'बिल्ली बिल्ली', '३२ बोर', 'जिमी चू', 'मिलियन डॉलर', 'टू मनी गर्ल' आणि 'हरियाणा रोडवेज' अशी अनेक प्रसिद्ध गाणी त्याने गायली आहेत. तसेच तो एल्विश यादवसोबत ३२ बोर या गाण्यात दिसला होता.
२०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली
राहुल फाजिलपुरियाचे खरे मामा राहुल यादव असे आहे, तो गुरुग्राममधील फाजिलपूर झारसा या छोट्याशा गावाचा रहिवासी आहे. त्याने २०२४ ची लोकसभा निवडणूकही लढवली होती.त्याने दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्ष (जेजेपी) पक्षाच्या तिकिटावर गुरुग्राममधून निवडणूक लढवली होती. मात्र यात त्याला पराभव पत्करावा लागला.
कोब्रा घोटाळ्यात नाव
२०२३ मध्ये नोएडा येथे झालेल्या कोब्रा घोटाळ्यात एल्विश यादवसोबत राहुल फाजिलपुरियाचे नावही पुढे आले होते. एल्विशच्या म्युझिक व्हिडिओमध्ये दोन साप दिसले होते. त्या संबंधितच ही कारवाई झाली होती. मात्र, प्रसार माध्यमांशी बोलताना फाजिलपुरियाने म्हंटले होते की, सापांचा वापर फक्त म्युझिक व्हिडिओसाठी करण्यात आला होता.
विलासी जीवनशैलीसाठी प्रसिद्ध
राहुल फाजिलपुरिया त्याच्या विलासी जीवनशैलीसाठी पदेखील प्रसिद्ध आहे, तो केवळ भारतात नव्हे तर यूके आणि कॅनडामध्येही प्रसिद्ध आहे. स्पोर्ट्स कारचा शौकीन असलेला हा गायक अनेक आलिशान वाहनांचा मालक आहे.