परराष्ट्र मंत्री त्यांच्या दोन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात सकाळी सिंगापूरहून बीजिंगला पोहोचले. जयशंकर चीनच्या तियानजिन शहरात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत सहभागी होण्यासाठी चीन दौऱ्यावर आहेत. भारत आणि चीन दरम्यान २०२० मध्ये लडाखमध्ये तणाव निर्माण झाला. यानंतर पहिल्यांदाच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर चीनच्या दौऱ्यावर आहेत. सकारात्मक चर्चेने एस. जयशंकर यांच्या चीन दौऱ्याची सुरुवात झाली आहे. दौरा यशस्वी होईल, असा विश्वास एस. जयशंकर यांनी व्यक्त केला.
भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचे सामान्यीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कैलास मानसरोवर यात्रा हा या प्रक्रियेचा एक भाग आहे. मानसरोवरला जाण्यासाठीचा सोपा मार्ग सध्या ज्या भूभाभागत चीनचे नियंत्रण आहे त्या भागातून जातो. भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चर्चेअंती चीनने या मार्गाचा वापर करुन पर्यटकांना मानसरोवला जाण्याची परवानगी दिली आहे. आता आणखी काही मुद्यांवर चर्चा होणार आहे. चर्चेद्वारे मैत्री वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीतही सहभागी होणार आहेत. तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठ होत आहे. या बैठकीत एस. जयशंकर भारताची बाजू मांडतील तसेच आशियाच्या विकासात परस्पर सहकार्यातून द्यायचे योगदान या विषयावर सविस्तर बोलणार आहेत. या व्यतिरिक्त परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या सदस्यांशी द्विपक्षीय चर्चा पण करणार आहेत.