Saturday, August 2, 2025

पुणे विद्यापीठात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

पुणे विद्यापीठात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

पुणे : पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. अभियांत्रिकीचे अर्थात इंजिनिअरिंगचे विद्यार्थी मोठ्या संख्येने विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोर बसून आंदोलन करत आहेत. घोषणा देत आहेत. आमची परीक्षा पुन्हा घ्या, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.


नुकताच इंजिनिअरिंग परीक्षेचा निकाल लागला आहे . विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार या निकालात मोठा घोळ आहे . त्यामुळे आमची पुन्हा परीक्षा घ्या अशी मागणी विद्यार्थी करत आहे . यासाठी विद्यापीठासमोर ठिय्या मांडून विद्यार्थी आंदोलन करत आहेत . कुलगुरुंनी येऊन आमची भेट घ्यावी , आमच्या मागण्या मान्य कराव्या अशा घोषणा विद्यार्थी देत आहेत .


कुलगुरुंनी विद्यार्थ्यांना भेटण्यास नकार दिल्याने हे आंदोलन चिघळले . विद्यापीठाच्या गेटवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता . विद्यार्थ्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे विद्यापीठाचे गेट तोडून विद्यार्थी कुलगुरुंच्या कार्यालयाकडे पळत सुटले . यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले आणि त्यांचा एक गट कुलगुरूंना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात पाठवला .

Comments
Add Comment