
मुंबई : टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांची अमेरिकन कंपनी ‘टेस्ला’चा आता भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेची बदललेले व्यापर धोरण, समीकरण आणि आयात शुल्काचा फटका भारतासह जगातील सर्वच देशांना बसलाय. त्यात भारतात टेस्लाचा होत असलेला प्रवेश ही फार मोठी सकारात्मक घडामोड मानली जात आहे.
येत्या मंगळवारी मुंबईत टेस्लाचे भारतातील पहिले शोरूम सुरू होत आहे. या शोरुममध्ये ग्राहकांना टेस्लाच्या दमदार इलेक्ट्रिक कार जवळून पाहता येतील. तसेच या आलिशान कारची टेस्ट ड्राईव्हही याच आठवड्यापासून ग्राहकांकरता उपलब्ध होईल. या शोरूममध्ये ग्राहकांचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी अनेक एआय फीचर्ससुद्धा उपलब्ध करण्यात आलेत आहेत. इंटरॲक्टिव्ह स्क्रीन आणि डिस्प्लेच्या माध्यमातून ग्राहकांना कारची माहिती मिळेल. हे सेंटर केवळ ईव्ही कारच शोरूम नाही तर इथ ग्राहकांना टेस्लाची मॉडेल ३, मॉडेल वाय, मॉडेल एस, मॉडेल एक्स, सायबरट्रकचीही माहिती मिळेल.