Sunday, September 7, 2025

Dolly Chaiwala: आता डॉली चायवालाचा ब्रँड देशाच्या कानाकोपऱ्यात! सोशल मीडियावर होतेय प्रचंड चर्चा

Dolly Chaiwala: आता डॉली चायवालाचा ब्रँड देशाच्या कानाकोपऱ्यात! सोशल मीडियावर होतेय प्रचंड चर्चा

मुंबई: तुम्ही डॉली चायवालाचे नाव तर नक्कीच ऐकले असेल. आजकाल तो महागड्या गाड्यांमध्ये दिसून येतो, तसेच त्याच्या आलिशान जीवनशैलीमुळे देखील तो प्रचंड चर्चेत आहे. खास करून, बिल गेट्ससोबतच्या व्हिडीओनंतर तर  त्याच्या प्रसिद्धीला उच्चांकच मिळाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा चायवाला आता आपला व्यवसाय देशभर पसरवू पाहत आहे. त्यासाठी तो देशभरात डॉली चायवालाच्या दुकानाची फ्रँचायझी उघडणार आहे. या संदर्भात त्याने सोशल मिडियावर पोस्ट करत माहिती दिली.

चहाची फ्रँचायझी उघडणार

डॉली चायवाला देशभरात त्याच्या दुकानाची फ्रँचायझी उघडणार आहे. याबाद्दम त्याने स्वतः इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे याची माहिती दिली. त्याच्या लोकप्रिय चहाच्या ब्रँडचा विस्तार करण्याच्या योजनेचा खुलासा करताना त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'आम्हाला संपूर्ण भारतात आमचे डॉली फ्रँचायझी चहाची दुकाने आणि गाड्या सुरू करण्याची खूप उत्सुकता आहे.' त्याने पुढे असेही म्हटले आहे की 'हा भारतातील पहिला व्हायरल स्ट्रीट ब्रँड आहे आणि आता व्यवसाय करण्याची नामी संधी आहे. गाड्यांपासून ते कॅफेपर्यंत, आम्ही देशभरात आमचा ब्रँड लाँच करत आहोत आणि हे स्वप्न पुढे नेण्यासाठी प्रामाणिक आणि आवड असलेल्या खऱ्या लोकांचा शोध आम्ही घेत आहोत.डॉलीने इन्स्टाग्राम मार्फत लोकांना फ्रँचायझी उघडण्यासंबंधित माहिती देखील दिली.

सोशल मीडियावर चर्चा

डॉली चायवालाने फ्रँचायझीची घोषणा केल्यानंतर, आता सोशल मीडियावर त्याच्याबद्दल बरीच चर्चा सुरू झाली आहे. त्याने केलेल्या पोस्टवर संमिश्र टिप्पण्या येत आहेत. अनेक लोकं त्याचे अभिनंदन करत आहेत, तर काहींनी शिक्षण घेऊन काही फायदा नाही, असेच काही करून मोठे व्हा असे म्हंटले आहे. तसेच आणखीन एका युजर्सने लिहिले आहे की "तो हे सहन करू शकत नाही."

Comments
Add Comment